Kharif Crop Competition agrowon
ॲग्रो विशेष

Crop Competition : रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा

Rabi Season : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Buldana News : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

यामध्ये अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांचा समावेश असून, रब्बी हंगाम सन २०२३ स्पर्धेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकरी विविध प्रयोग करीत असतात. अशा शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी ३०० व आदिवासींसाठी १५० रुपये आहे.

...अशी मिळतील बक्षिसे

तालुकास्तरीय पहिले ५ हजार रुपये, द्वितीय तीन आणि तृतीय दोन हजार रुपये , जिल्हास्तरीय प्रथम १०, द्वितीय ७ आणि तिसरे ५ हजार, राज्य पातळीवर प्रथम ५० हजार, द्वितीय ४० आणि तृतीय बक्षिस हे ३० हजार रुपये ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT