Rabi Crop Competition : रब्बीतील पिकांसाठी होणार पीक स्पर्धा

Agriculture Department : कृषी विभागांमार्फत रब्बी हंगाम- २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटांसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Rabi Crop
Rabi CropAgrowon
Published on
Updated on

Solapur News : कृषी विभागांमार्फत रब्बी हंगाम- २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटांसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पीकस्पर्धा राबविण्यात येईल. पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

Rabi Crop
Rabi Crop Insurance : ‘रब्बी’तही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा

यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पीकस्पर्धेचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येतील. वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच अधिकाधिक शेतकरी पीक स्पर्धांमध्ये सहभागी होतील, या दृष्टिकोनातून रब्बी हंगाम २०२३ पासून पीकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येईल.

Rabi Crop
Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्बीची ५३ टक्के पेरणी

स्पर्धेचे पात्रता निकष

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल.

पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थींच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक

स्पर्धेसाठी इथे करा संपर्क

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये असणार आहे. पीकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com