Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद

Kharif Season 2025 : यंदा ( २०२५ साठी) जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ७७० खातेदारांना १५९६ कोटी ६३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : ‘अर्ज द्या कर्ज’ घ्या उपक्रमांतर्गत अंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (ता. ९) चित्ते-पिंपळगाव व चित्तेगाव या ग्रामपंचायती मार्फत चित्तेगाव येथे आयोजित कर्ज मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन व बॅंका मिळून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ अभियानही जिल्ह्यात सुरु केले आहे. ३ ते १० जुलै दरम्यान हे अभियान जिल्ह्यातील ३७५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे.

चित्ते पिंपळगाव सरपंच पांडुरंग सोनोने, चित्तेगाव सरपंच सरला सुदाम गावंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव, तहसीलदार कैलास वाघमारे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे, मंडळ अधिकारी ए.एल. सुरपाम, तनुजा जगताप, वंदना खेडकर, मंजुषा काचोळे उपस्थित होते.

कर्ज वितरण स्थिती अशी...

यंदा ( २०२५ साठी) जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ७७० खातेदारांना १५९६ कोटी ६३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ६७० कोटी ५५ लक्ष रुपये इतके कर्ज ८६ हजार ६९७ शेतकऱ्यांना वाटप झाले होते. म्हणजेच ४२ टक्के पीककर्ज वाटप झाले होते.

आता अभियान सुरु केल्यापासून (ता.३ पासून) आजतागायत ६४०५ शेतकऱ्यांना ५९ कोटी ३० लक्ष रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. या हंगामात एकूण आतापर्यंत ९३ हजार १०२ शेतकऱ्यांना ७३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती मोघे यांनी दिली.

खरीप हंगाम आता ऐन मध्यावर आला आहे. आताच शेतकऱ्यांना पैशांची गरज असते, तेव्हा बॅंकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे.
-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीच्या दरावरील दबाव कायम, गवारला उठाव कायम, शेवगा महागले; काकडी आवक वाढली, लसूणचे भाव स्थिर

Maharashtra Heavy Rain: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार

Water Storage : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ प्रकल्प पूर्ण भरले

Soybean MSP : सांगली जिल्ह्यात सोयाबीनला हमीभाव केवळ कागदावरच

Electricity Production : जळगावात होणार ६८२ मेगावॉट अतिरिक्त वीजनिर्मिती

SCROLL FOR NEXT