Crop Loan : बुलडाणा जिल्ह्यात खरीप पीक कर्जवाटप संथगतीने

Kharif Season 2025 : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळेल, अशी आशा होती. पण विविध कारणे पुढे करीत बँकांनी दिरंगाई चालवली आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Buldana News : या खरीप हंगामाची लगबग जोरात सुरू असताना जिल्ह्यातील तब्बल ८० टक्क्यांवर शेतकरी अद्यापही पीककर्जापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. सरकारने हंगामासाठी १५०० कोटींचा लक्ष्यांक निर्धारित केला असून, या रकमेपैकी ३१ टक्के रक्कमच वितरित झाली. हा पैसा केवळ १९ टक्के शेतकऱ्यांनाच मिळाला.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळेल, अशी आशा होती. पण विविध कारणे पुढे करीत बँकांनी दिरंगाई चालवली आहे. जिल्ह्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात आलेल्या असून शेतकऱ्यांनी बँक कर्ज मिळेल या अपेक्षेने उसनवारी करीत बी-बियाणे, खतांची खरेदी केली.

Crop Loan
Crop Loan : खरीप कर्जवाटपात जिल्हा बँक राज्यात आघाडीवर ः पाटील

मात्र बँकांनी कर्जवाटपात मागे राहिल्या. आता या शेतकऱ्यांना हा पैसा फेडण्याचे दडपण सहन करण्याशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यातील १९ टक्के शेतकऱ्यांना मिळाले आहे. जिल्ह्यात एकूण १.५६ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ २९,३३५ शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे.

Crop Loan
Crop Loan : बँकांनी पीककर्जाची गती वाढवावी

ही संख्या फक्त १९ टक्के एवढी आहे. ४५७.८८ कोटी रुपये आजवर वितरित झाले. हे केवळ एकूण उद्दिष्टाच्या ३१ टक्के इतके आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी अत्यंत निराशाजनक दिसून येत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ५०० कोटींच्या उद्दिष्टापैकी फक्त ९९.४८ कोटींचेच वाटप केले. कॅनरा बँकेने केवळ १६ टक्के वाटप केले. बँकांनी शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्रुटींमुळे रखडत ठेवले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com