
Sangli News : जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बळीराजाची पेरणीची घाई आहे. या हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जूनअखेर तब्बल ८०१ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यात कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ७० टक्के पूर्ण झाले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ८८ हजार १५४ शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली. यंदाच्या खरीप हंगामासाठी सांगली जिल्हा बॅंकेसाठी ९३ हजार ३६७ शेतकऱ्यांना ११३३ कोटी ५६ लाख इतके लक्ष्यांक आहे. यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतात पेरणीची घाई सुरू आहे.
त्यासाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी लगबग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पेरणीला विलंब झाला आहे. तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाला शून्य टक्के व्याज आकारले जाते. जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केले जात आहे.
एप्रिलअखेर जिल्हा बॅंकेने ४२ हजार ४६ शेतकऱ्यांना ३६३ कोटी ३७ लाखाचे कर्ज वितरण केले होते. अपेक्षित पाऊस झाल्याने शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी जिल्हा बँकेकडे धाव घेवू लागला आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामातील पिकांसाठी ११३३ कोटी ५६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यापैकी सध्या ८८ हजार १५४ शेतकऱ्यांना ८०१ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उर्वरित कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे.
जिल्हा बँकेने पीकनिहाय वितरित केलेले कर्ज
५०३८४ शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी ४४५.९ कोटी रुपये वाटप.
६०२० शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी २.१६ कोटी रुपये वाटप.
६०८२ शेतकऱ्यांना डाळिंबासाठी ६.१८ कोटी रुपये वाटप.
१००३० शेतकऱ्यांना द्राक्ष पिकासाठी २१७.९७ कोटी रुपये वाटप.
११६४७ शेतकऱ्यांना कापसासाठी ३.९६ कोटी रुपये वाटप.
१०१६ शेतकऱ्यांना इतर पिकांसाठी ६.८२ कोटी रुपये वाटप.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.