Apple Cultivation Marathwada  Agrowon
ॲग्रो विशेष

Apple Farming Marathwada : मराठवाड्यात सफरचंद लागवडीचा प्रयोग

Apple Plantation : मराठवाडा विभागातील हवामानात काश्मीरमधील सफरचंद फळपीक कसे तग धरते हे तपासण्यासाठी हिमायतबाग फळ संशोधन केंद्राने सफरचंद फळपिकाच्या लागवडीचा प्रयोग हाती घेतला आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाडा विभागातील हवामानात काश्मीरमधील सफरचंद फळपीक कसे तग धरते हे तपासण्यासाठी हिमायतबाग फळ संशोधन केंद्राने सफरचंद फळपिकाच्या लागवडीचा प्रयोग हाती घेतला आहे. नुकतेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते सफरचंद पिकाची लागवड करून या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली.

या वेळी कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, उपसंचालक हरिहर कौसडीकर, केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील आदींची उपस्थिती होती. नुकताच विभागीय कृषी संशोधन व सल्लागार समितीच्या बैठकीत शेतकरी नाविन्यपूर्ण फळ पिकांची लागवड करीत आहेत.

त्यांना दिशा देण्यासाठी सफरचंद, अव्हाकॅडो, ड्रॅगन फ्रुट्स आदी नाविन्यपूर्ण फळपिकांच्या लागवड तंत्रज्ञानाच्या व्यवस्थापनाची माहिती देण्याच्या अनुषंगाने सूचना करण्यात आली होती. त्यामुळे या प्रयोगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

फळ संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर सफरचंद लागवडीचा प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले, की हा प्रयोग सफरचंद लागवड करणाऱ्या व करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक असेल. विभागातील पारंपरिक फळ पिकांबरोबरच इतर फळपिकांची लागवड मराठवाडा प्रदेशात करून त्याचा अभ्यास करण्याचा मानस विद्यापीठाचा आहे.

अव्हाकॅडो, बेल, ड्रॅगन फ्रूट, आंबा पिकांची विविध वाण आदी पिकांची लागवड विद्यापीठ प्रक्षेत्रावर करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यास मदत होणार आहे. या वेळी डॉ. रवींद्र नैनवाड, प्रशांत सुरडकर, डॉ. सदाशिव अडकिने, शेख इसाक, डॉ. विजय सावंत आदींची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: शिवसैनिक खचला नाही, पेटून उठलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Women SHGs: महिला बचत गटांना २५ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट

Below Average Rainfall: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ७३ मंडलांत सरासरीहून कमी पाऊस

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमधील ३३ गावांची होणार फेरतपासणी

Water Conservation: अबिटघरमध्ये जलसंधारणाला गती

SCROLL FOR NEXT