Apple Farming : तप्त राळेगाव शिवारात बहरले सफरचंद

Success Story : प्रयोगशीलतेला चालना देत राळेगाव तालुक्‍यातील वाढोणा बाजारच्या संदीप हांडे या शेतकऱ्याने चक्‍क सफरचंद लागवड यशस्वी केली आहे.
Apple Farming
Apple Farming Agrowon

Yavatmal News : प्रयोगशीलतेला चालना देत राळेगाव तालुक्‍यातील वाढोणा बाजारच्या संदीप हांडे या शेतकऱ्याने चक्‍क सफरचंद लागवड यशस्वी केली आहे. एक एकर क्षेत्रावर तब्बल ४२५ झाडांची लागवड त्यांनी केली असून, यंदा काही वैयक्तिक कारणास्तव त्यांना बहर घेता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.

राळेगाव तालुका हा लाल मिरची उत्पादनासाठी ओळखला जातो. तेलंगणा राज्यातील शेतकरीदेखील या परिसरातील काही गावांमध्ये करार शेतीच्या माध्यमातून मिरची लागवड करतात. याच तालुक्‍यातील वाढोणा गावच्या संदीप हांडे यांनी मिरचीच्या जोडीला सफरचंद लागवडीचा प्रयोग केला आहे.

Apple Farming
Agriculture Success Story : प्रयोगशीलता जपत शेतीतून साधली प्रगती

२०२२ मध्ये ४२० झाडांची लागवड करण्यात आली. त्यातील ४२० झाडे जगली. या झाडांना २०२३ मध्ये फळधारणा झाली. हरिमन-९९, अण्णा, डोरसेट-बोल्डर या जातीच्या अधिक तापमानात येणाऱ्या सफरचंदाची शिफारस महाराष्ट्राकरिता करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये छाटणी, त्यानंतर पाणी आणि खत (एनपीके) दिल्यानंतर फेब्रुवारीत बाग फुलावर येते. १०० ते २०० ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे खत देण्यावर भर राहतो. मे आणि जूनच्या दरम्यान फळ परिपक्‍व होतात. बागेला पाणी ड्रीपने दिले जाते. यंदा बागेतून सफरचंद फळांची व्यावसायिक उत्पादकता शक्‍य झाली असती परंतु आजारपणामुळे शास्त्रोक्‍त छाटणी करता आली नाही. त्याच कारणामुळे यंदा बहार घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Apple Farming
Agriculture Success Story : मका, काकडी पिकातून मिळवले आर्थिक स्थैर्य

बिलासपूर, हिमाचल प्रदेशमधील तज्ज्ञांकडून सफरचंद पिकाच्या व्यवस्थापनाचे बारकावे त्याने जाणून घेतले. त्यानंतरच या भागात हे पीक घेण्याचे ठरविले. त्यांच्या या प्रयोगाची दखल कृषी विभागाने देखील घेतली आहे.

शास्त्रोक्‍त छाटणीवर भर

सफरचंद बागेतील छाटणी ही शास्त्रोक्‍त पद्धतीने करावी लागते. त्यामुळे ती नजरेसमोरच झाली पाहिजे. त्याकरिता कौशल्यपूर्ण मजूर असावा. तो उपलब्ध नसेल तर नुकसान होण्याची भीती राहते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com