Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop Insurance : कांद्याचा पीकविमा घेण्याचे आवाहन

Crop Insurance Scheme : कृषी विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे रब्बी हंगामासाठी कांदा पिकाला विमा संरक्षण मिळणार आहे.

Team Agrowon

Satara News : कृषी विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे रब्बी हंगामासाठी कांदा पिकाला विमा संरक्षण मिळणार आहे. त्यासाठी पाच तालुक्यांत आतापर्यंत पाच हजार हेक्टरवरून अधिक रब्बीची कांदा लागवड झाली असून, या वेळेस शेतकऱ्यांना एक रुपयांत कांदा पिकाला विमा संरक्षण घेता येणार असून, शेतकऱ्यांनी एक रुपया भरुन पीक विमा घेण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

दुष्काळी पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले जाते. यामध्ये कोरेगाव, खटाव, माण, खंडाळा, फलटण तालुक्यांचा समावेश आहे. रब्बी कांद्याला मोठी मागणी असल्याने या पिकाखालील क्षेत्र प्रत्येक वर्षी वाढते.

पण दरात होणारे चढ-उतार व अवकाळी पावसामुळे होणारे कांदा पिकांचे नुकसान लक्षात घेऊन कांद्याला विमा संरक्षण दिले आहे. त्यामुळे जरी नुकसान झाले, तरी हेक्टरी ४६ हजार रुपये भरपाई मिळणार आहे.

त्यासाठी हेक्टरी नऊ हजार ५२२ रुपये विमा हप्ता असून, हा हप्ता शासन भरणार आहे. तर शेतकऱ्यांना मात्र, एक रुपयात विमा संरक्षण घेता येणार आहे. रब्बी हंगामात तब्बल पाच हजारांहून अधिक हेक्टरवर कांदा लागवड असून, पाच तालुक्यांचा विमा संरक्षणात सहभाग झाला आहे.

ज्या शेतकऱ्यांचे राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा बॅंकेत खाते आहे, अशा शेतकऱ्यांनी बॅंकेत अथवा टपाल कार्यालयात जाऊन विमा हप्ता भरावा. त्यासाठी कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
- भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT