
Amaravati News : यंदाच्या रब्बी हंगामासाठी पीकविमा काढण्याची १५ डिसेंबर ही अखेरची मुदत आहे. गहू, हरभरा व कांदा या पिकांसाठी पंतप्रधान पीकविमा योजनेतून केवळ एक रुपया प्रीमियम भरून विमा काढण्याची सवलत देण्यात आली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ९ हजार ९७६ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला असून, रब्बी हंगामात पेरणीखालील अपेक्षित शेतजमिनीच्या तुलनेत १७ टक्के शेतजमीन विमा संरक्षित झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे आर्थिक अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना विमा परतावा हा आधार ठरतो. पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत एक रुपया प्रीमियम भरून विमा काढण्याची सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू असून, आतापर्यंत एकूण लागवडीयोग्य शेतजमिनीपैकी ६३ टक्के क्षेत्रात रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात १ लाख ४८ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षित असून, ९४ हजार ४२५ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे.
पेरण्या अद्याप सुरूच आहेत. दरम्यान जिल्ह्यातील चौदा तालुक्यांतील ९ हजार ९७६ शेतकऱ्यांनी प्रीमियम भरून या योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची ६२९ व बिगर कर्जदार शेतकऱ्यांची १३,०९५ असे एकूण १३ हजार ७२४ प्रकरणे दाखल झाली आहेत.
रब्बी हंगामात गहू, हरभरा व कांदा या पिकांची लागवड या जिल्ह्यात होते. यामध्ये हरभऱ्याखाली सर्वाधिक क्षेत्र राहत असून, त्यातुलनेत गव्हाखाली कमी क्षेत्र येते. आतापर्यंत झालेल्या पेरणी क्षेत्रापैकी १६ हजार ३४२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले असून, त्याची सरासरी केवळ १७.३० टक्के आहे.
डिसेंबरच्या अखेरीस व जानेवारी महिन्याच्या प्रारंभी अवकाळी पाऊस, गारपीट अशी नैसर्गिक आपत्ती येते, असा दरवर्षीचा अनुभव आहे. या आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा योजनेचे आर्थिक कवच दिल्या गेले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.