Benefit of Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Buldana News : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यावर्षीच्या आंबिया बहारामध्ये सहा फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठीच्या आंबिया बहारामध्ये आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष, मोसंबी आणि संत्रा या सहा फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.

अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जादा तापमान, जास्त पाऊस आणि गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक साहाय्य देणे व फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात येते.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळ पिके घेणारे यात कुळाने भाड्याने पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे.

या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले आहे. ३५ टक्क्यांवरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकऱ्यांनी ५०-५० टक्के प्रमाणे भरावयाचे आहे.

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादित एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे. अधिसूचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहार यापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल, यात संत्रा, मोसंबी आणि डाळिंब फळांचा समावेश आहे.

केवळ उत्पादनक्षम फळबागानाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. फळपीकनिहाय निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय होते. विमाक्षेत्र घटक महसूल मंडळ राहील. बँकेकडून अधिसूचित फळपिकासाठी पीककर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत फळपीक निहाय देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी कर्जदार आणि बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे, यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, मोसंबी ३१ ऑक्टोबर २०२३, केळी ३१ ऑक्टोबर २०२३, संत्रा ३० नोव्हेंबर २०२३, आंबा ३१ डिसेंबर, तर डाळिंब १४ जानेवारी २०२४ ही अंतिम तारीख आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँक किंवा क्षेत्रीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT