Shetkari Sangh Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघाच्या वार्षिक सभेत गोंधळ, पोटनियम दुरुस्तीचा ठराव मंजूर

Kolhapur Shetkari Sangh : कोल्हापुरातील शेतकरी संघाची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.२७) झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.

sandeep Shirguppe

Shetkari Sangh Sabha : विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर न देताच अहवालातील विषय मंजूर करत शेतकरी संघाची वार्षिक सभा तासाभरात आटोपती घेण्यात आली. दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.२७) आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.

व्यक्ती व संस्था सभासद शेअर्स रक्कम वाढविणे, सलग तीन वर्षे लाख रुपये ठेव ठेवणे, व्यक्ती सभासदाने संघाने उत्पादित केलेला माल किमान तीन वर्षे दहा हजार व संस्था सभासदाने किमान तीन वर्षे २५ हजार रुपयांची खरेदी करावी, असा पोटनियम दुरुस्तीचा ठराव शेतकरी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळात मंजूर करण्यात आला. याबाबत विरोधकांनी प्रश्‍न उपस्थित केल्यावर त्याला उत्तर न देताच अहवालातील विषय मंजूर करीत सभा तासाभरात आटोपती घेतली.

पाटील म्हणाले, ‘खत कारखान्याचा रद्द झालेला परवाना १५ दिवसांत पुन्हा मिळविला जाईल. यंत्रसामग्रीची डागडुजी करून तो पूर्ण क्षमतेने चालविला जाईल. मॅग्नेटचा प्रश्न सहा महिन्यांत सोडवू. नवरात्रोत्सवासाठी भाविकांना दर्शनरांगेसाठी संघाचा तळमजला देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र आले आहे; परंतू संघाला याचे भाडे मिळणार असेल तरच संमती दिली जाईल.

सभासदांच्या मागणीनुसार कार्यकारी संचालक पदासाठी दोन वेळा वृत्तपत्रात जाहीरात दिली; परंतु, एकही अर्ज आलेला नाही.’ विषय वाचनावेळी सभासदांनी विविध प्रश्‍न उपस्थित केले. त्याला अध्यक्षांसह उपाध्यक्ष, संचालक व अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली; परंतु पोटनियम दुरुस्तीबाबत विरोधी आघाडीचे नेते व माजी अध्यक्ष सुरेश देसाई यांनी प्रश्‍न उपस्थित करताच अन्य सभासदांनी गोंधळ घालत त्यांना रोखले. अध्यक्षांनीही थेट उत्तर द्यायचे टाळले. यावेळी गोंधळात यासह संपूर्ण विषय मंजूर करण्यात आले. यानंतर गोंधळात संपूर्ण अहवाल मंजूर केला गेला.

संघाचा व्यापारी नफा सात कोटी आहे आणि कर्मचाऱ्यांवरील खर्च पाच कोटी असल्याचे निदर्शनास येत आहे. कर्मचाऱ्यांना पगार कमी असतील तर जादा होणारा खर्च अनावश्यक आहे का? अनावश्यक नोकर भरती केली आहे का? असा सवाल रघुनाथ चव्हाण यांनी केला. संघाचे उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांनी आभार मानले.

‘शाखा तपासणी बंद केल्यामुळेच अपहार’

संघाच्या कार्वे शाखेत पहिल्यांदा ८१ लाखांचा अपहार झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांत सहा लाखांचा अपहार झाला. याबाबत संबंधितांवर काय कारवाई केली? अशी विचारणा संपत इनामदार यांनी केली. यावर प्रभारी कार्यकारी संचालक दीपक देसाई यांनी हे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगितले. यावर शाखांची अंतर्गत तपासणी बंद केल्यामुळेच अपहाराचे प्रकार घडत आहेत. ते रोखण्यासाठी तपासणी पथके नेमावीत, अशी सूचना इनामदार यांनी मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT