UPSC Result
UPSC Result Agrowon
ॲग्रो विशेष

UPSC Success Story : अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील अंकेतची युपीएससी परिक्षेत भरारी

Team Agrowon

Himgoli News : हिंगोली जिल्ह्यातील शिवणी ब्रुद्रुक (ता. कळमनुरी) येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील डॉ. अंकेत केशवराव जाधव यांना पहिल्याच प्रयत्नांत केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परिक्षेत ३९५ रँक मिळाली आहे. डॉ. अंकेत यांच्या यशामुळे हिंगोली जिल्ह्याचा नावलौकिक देशभरात वाढविला आहे.

शिवणी बुद्रूक येथील केशवराव जाधव यांना साडेचार एकर जमीन आहे. सोयाबीन, कापूस, तूर ही पिके घेतात. हंगामी सिंचनाची सुविधा आहे. रब्बीतील हरभरा हे प्रमुख पीक आहे.केशवराव कला शाखेचे पदवीधर आहेत.

त्यांचे चार सदस्यांचे कुटुंब आहे. त्यांचा मुलगा डॉ. अंकेत यांचे शालेय शिक्षण शिक्षण शिवणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळमनुरी येथील महात्मा फुले विद्यालयात झाले.

दहावीच्या परिक्षेत ९८ टक्के गुणसंपादन करुन अंकेत जिल्ह्यात प्रथम आला होता. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातून २०१६ मध्ये बारावी (विज्ञान) ९५ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. सामाईक प्रवेश परिक्षाद्वारे पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात (ससून) एम. बी. बी. एस. साठी प्रवेश मिळाला.

२०२२ मध्ये एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर पुणे येथेच इंटर्नशिप करत असतानात कोरोना काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास केला. मंगळवारी (ता. १६) युपीएससीचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात अंकेत यांना ३९५ वी रँक मिळाली.

दरम्यान डॉ. अंकेत यांची यंदाच्या मार्च महिन्यात जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाली. सुरवातीला गिरगाव व सध्या वाकोडी (ता. कळमनुरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आई, वडिलांचे पाठबळ, शिक्षक, वरिष्ठांचे मार्गदर्शन, वाचनातून झालेला वैचारिक बदल यामुळे पहिल्याच प्रयत्नात युपीएससीतील यशाला गवसणी घालता आली, असे डॉ. अंकेत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Finland Banking System : फिनलँडमधील सक्षम सहकारी बँकिंग व्यवस्था

Agriculture Success Story : माळरानाचे पालटले चित्र...

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनास हवामान अनुकूल

Fodder Shortage : हिरव्यागार उसाची चाऱ्यासाठी तोड

Pomegranate Farming : प्रशिक्षित स्थानिक मजुरांमुळे डाळिंब उत्पादकांचा खर्च वाचला

SCROLL FOR NEXT