Maize crop Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Crop : मक्याच्या शेतात सोडली जनावरे

Maize Crop Damage : धुळे तालुक्यासह जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. तब्बल ३५ दिवसांनी पावसाचे पुनरागमन झाले. बाजरी, ज्वारीची कणसे व मक्याच्या भुणक्यात दाणे भरणेच झाले नाही.

Team Agrowon

Latest Agriculture News : धुळे तालुक्यासह जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. तब्बल ३५ दिवसांनी पावसाचे पुनरागमन झाले. बाजरी, ज्वारीची कणसे व मक्याच्या भुणक्यात दाणे भरणेच झाले नाही. दाण्यांविना पिके उभी आहेत.

पुरेशी वाढही झालेली नाही. अशा पिकांना कापणीचा खर्च करण्यापेक्षा त्यात गुरे सोडून चारली जात आहेत. काही शेतकऱ्यांनी गायी-म्हशी पाळणाऱ्यांना दोन-चार हजारांत चारण्यासाठी दिली आहेत. दुष्काळाची गंभीर स्थिती स्पष्ट होत आहे.

धुळे जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढतच चालली आहे. मूग, उडीद व मटकी ही पिके पावसाअभावी ऑगस्टमध्येच करपली. ही नगदी पिके वाया गेल्याने, ऐन हंगामात शेतकऱ्यांनी शून्य कमाई झाली.

हा हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. ज्वारी, बाजरी, मका आणि कपाशी ही पिके तग धरून उभी होती. त्यांना पावसाअभावी दाणे भरले गेले नाहीत. कणसे आणि भुणके रिकामीच आहेत. त्यांची पुरेशी वाढ झालेली नाही.

ज्या शेतकऱ्यांकडे गुरे आहेत, त्यांनी निदान चारा तरी वैरण म्हणून कामास येईल म्हणून पिके कापण्यास सुरवात केली. ज्यांच्याकडे गुरेढोरे नाहीत, ते मेंढपाळ, अधिक संख्येने गुरे असणाऱ्यांना अल्पभावात चारा विक्री करीत आहेत. काही शेतात चाराही कापण्याचा खर्च निघणार नसल्याने, त्यांनी उभ्या पिकात गुरेढोरे व शेळ्यामेंढ्या सोडल्या जात आहेत.

धुळे तालुक्यात दुष्काळाची दाहकता मोठी आहे. पिके काढणीचाही खर्च निघत नाही. शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. सरकारने सरसकट दुष्काळ घोषित करून मदत करावी.
-प्रवीण पाटील, युवा शेतकरी व उपसरपंच, कापडणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT