Weather  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Heat Issue : वाढत्या कडक उन्हाचा जनावरांनाही फटका

Summer Weather : यंदा एप्रिलमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांसह पशुधनावरही होत आहे.

Team Agrowon

Mumbai News : यंदा एप्रिलमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांसह पशुधनावरही होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी या दिवसांमध्ये पशूंची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पशुधन विभागाकडून सांगण्यात आले.

वाढत्या उन्हामुळे जनावरे भरपूर पाणी पितात. या दिवसांत कोरडा चारा खात नाहीत. वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या हालचाली मंदावतात. अतिप्रखर उन्हामुळे कातडी कोरडी पडते, जनावरे थकल्यासारखी होतात, भूक मंदावते, दूध देण्याचे प्रमाण कमी होते.

जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते, जोरात श्वास घेणे, भरपूर घाम येणे, अशी लक्षणे दिसू लागतात. अति उष्णतेमुळे जनावरांच्या नाकातून रक्तस्राव होतो. प्राथमिक प्रथमोपचार करून रक्तस्राव थांबत नसेल, तर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारातून जीवनसत्त्व क अथवा औषधाच्या माध्यमातून द्यावे. उन्हाळ्यात जनावरांची काळजी घेण्याची गरज आहे.

...अशी घ्या जनावरांची काळजी

शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.

दिवसातून एक ते दोन वेळा पाणी पाजण्याऐवजी चार ते पाच वेळा पाणी पाजावे.

दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. ओले कापड अथवा गोणपाट जनावरांच्या डोक्यावर ठेवावे. त्यावर वारंवार पाणी मारावे.

शक्य असल्यास गोठ्यामध्ये स्प्रिंकलर किंवा फॉगरचा वापर करावा. गोठ्याचे छप्पर गवत, भाताचा पेंढा, नारळाच्या झावळ्यांनी झाकून घ्यावे.

वारा वाहत असलेल्या दिशेने गोठ्याच्या बाजूस पाण्यात भिजविलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे. काही काळानंतर त्यावर हलके पाणी शिंपडावे.

जनावरांना सकाळी किंवा सायंकाळी चरावयास न्यावे. दुपारच्या वेळी जनावरांना चरावयाला नेणे टाळावे.

जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी न देता, विभागणी करून तीन ते चार वेळा द्यावा.

वाळलेले गवत, कडब्यावर मीठ किंवा गुळाचे पाणी शिंपडावे, म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT