Heat Wave : कोकण, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट शक्य

Weather News : वादळी पावसाच्या हजेरी बरोबरच राज्याचे कमाल तापमान पुन्हा वाढले आहे. अनेक ठिकाणी पारा ४१ अंशांच्या पार गेला आहे.
 Heat Wave
Heat WaveAgrowon

Weather Update : पुणे : वादळी पावसाच्या हजेरी बरोबरच राज्याचे कमाल तापमान पुन्हा वाढले आहे. अनेक ठिकाणी पारा ४१ अंशांच्या पार गेला आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे उष्णतेची लाट कायम आहे. आज (ता. १८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाटेचा (यलो अलर्ट) इशारा, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात ढगाळ हवामान झाले असून, आज (ता. १८) मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही सायंकाळनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.

 Heat Wave
Heat Wave : विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, धुळे येथे तापमान ४२ अंशाच्या वर आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार पोचला आहे.

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ४०.७, धुळे ४२.०, नगर ४०.०, जळगाव ४२.४, कोल्हापूर ३९.७, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.६, नाशिक ४०.७, निफाड ३९.७, सांगली ४१.०, सातारा ४०.३, सोलापूर ४१.७, सांताक्रूझ ३९.७, डहाणू ३६.२, रत्नागिरी ३३.८, छत्रपती संभाजीनगर ४०.५, नांदेड ४०.६, परभणी ४१.०, अकोला ४१.७, अमरावती ३८.०, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४०.८, चंद्रपूर ३९.८, गडचिरोली ३९.२, गोंदिया ३९.२, नागपूर ३९.०, वर्धा ४०.०, वाशीम ४०.२, यवतमाळ ४०.०.

- उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, सोलापूर, बीड.
- वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, नांदेड, धाराशिव, लातूर.

४१ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
मालेगाव ४२.६, जळगाव ४२.४, धुळे ४२.०, सोलापूर ४१.७, अकोला ४१.७, सांगली ४१.०, परभणी ४१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com