Kolhapur District Milk Sangh : पशुखाद्य वाहतुकीचे अंतर जादा दाखवून 'गोकुळ'च्या गडमुडशिंगी येथील पशुखाद्य कारखान्यात तब्बल ३५ लाखांवर रुपयांवर डल्ला मारल्याच्या प्रकरणाने एकच खळबळ माजली होती. मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा दूध संघात हे प्रकरण जोरदार गाजत आहे. त्यावर कारवाई करण्याऐवजी प्रकरण मिटवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान प्रकरण निदर्शनास आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली यामध्ये वाहतूक संस्थेसह 'गोकुळ'च्या पशुखाद्य कारखान्यातील काही कर्मचारी व अधिकारी सहभागी असल्याचे निदर्शनास आले. या अपहरणाची चर्चा काल (ता.१३) बैठकीत झाली. यामध्ये सहभागी असलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, तर संबंधित वाहतूक संस्थेकडून सर्व पैशाची वसुली करण्यात आली.
गोकुळ दूध संघात पशुखाद्य कारखान्यात वाहतूक संस्था व कर्मचाऱ्यांनी संगनमताने अंतर वाढवून ३५ लाखांचा अपहर केला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या मुडशिंगी पशुखाद्य कारखान्यात वाहतूक अंतर वाढवून झालेल्या अपहाराची रक्कम काल संबंधित वाहतूकदार संस्थेकडून वसूल करण्यात आली. याप्रकरणी दोषी असलेल्या संघाच्या चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
संचालकाचे नाव गुपीत
या प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांना दोषी धरण्यात आले आहे. चौकशीत या कर्मचाऱ्यांनी संबंधित ठेकेदार व एका जबाबदार संचालकांचे नाव घेतले आहे. तरीही त्याच कर्मचाऱ्यांवर हे प्रकरण ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून अस्वस्थ झालेल्या या कर्मचाऱ्यानेच संचालकांना इशारा दिल्यानंतर हे प्रकरण नेत्यांपर्यंत पोहचू नये यासाठी ते दाबण्याचा प्रयत्न करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
'गोकुळ'चा गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे अत्याधुनिक असा पशुखाद्य कारखाना आहे. या कारखान्यात तयार होणारे पशुखाद्य प्राथमिक दूध संस्थांना पाठवले जाते. त्यासाठी काही वाहतूक संस्थांना त्याचा ठेका दिला आहे, पण एक जबाबदार पदाधिकारी व धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या तालुक्याशी संबंधित वाहतूक संस्थेने किलोमीटरचे अंतर वाढवून बिले काढल्याचे उघडकीस आले आहे. त्यातून एक-दोन नव्हे तर तब्बल ३५ लाखांचा अपहार झाला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.