Animal Census Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Census : भीमाशंकर अभयारण्यात ‘वन्यजीव’तर्फे प्राणीगणना

Bhimashankar Sanctuary : बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने २२ आणि २३ रोजी प्राणिगणना करण्यात आल्याची माहिती भीमाशंकर अभयारण्य-१ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी दिली.

Team Agrowon

Pune News : भीमाशंकर अभयारण्यात पुणे वन्यजीव विभागाच्या वतीने उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, विभागीय वन अधिकारी स्नेहल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने २२ आणि २३ रोजी प्राणिगणना करण्यात आल्याची माहिती भीमाशंकर अभयारण्य-१ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी दिली.

चौरा क्रमांक १, चौरा क्रमांक २, वाजेवाडी, वीरतळे, घाटघर, भटटीचे रान, उघडी कळमजाई या पाणवठ्याच्या ठिकाणी पालापाचोळ्यांनी बनविलेल्या मचाणात बसून वन विभागाचे कर्मचारी आणि निसर्गप्रेमी यांनी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांवर लक्ष ठेवले आणि त्यांचे निरीक्षण, गणना केली.

प्राणिगणना करत असताना भीमाशंकर अभयारण्य हे घाटमाथ्यावरती असल्याने येथे धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने प्राणी निरीक्षण/निसर्गानुभव करताना थोडासा अडथळा आला. तसेच आठवड्यापूर्वी पाऊस पडला असल्याने ठिकठिकाणी पाणी असल्यामुळे पाणवठ्यावर प्राणी आणि पक्ष्यांची संख्या कमी दिसून आली.

प्राणी गणनेत रानडुक्कर १, भेकर ४, सांबर १, शेकरू ३, रान मांजर १, ससा १, मोर १, खवले मांजर १, खेकडा २ असे प्राणी दिसले. मचाणावर बसल्यानंतर एकमेकांशी बोलू नये, सहभागी निसर्गप्रेमींनी निसर्गाशी एकरूप होणारे कपडे परिधान करावेत, उग्रवास असणारे सुगंधी द्रव्य कपड्यावर मारू नये, रात्री बॅटरी अथवा विजेचा वापर करू नये, कोणत्याही प्रकारे अन्नपदार्थ, प्लॅस्टिक बॅग अशा स्वरूपाच्या वस्तू जवळ बाळगू नये, मचाण चारही बाजूंनी हिरव्या फांद्यांनी झाकून घ्यावे, अशा स्वरूपाच्या सूचना या वेळी करण्यात आल्या होत्या.

श्रीराम देशपांडे, गौरव वैद्य, संजय बाबर, सुजाता काळे, स्मिता बेलापूरकर, प्रीती नागनाथ, स्मिता व्यवहारे, नीलिमा पाठक, अभिषेक मंझिरे, नितीन हाडवळे, राहुल जगताप, वेदांत हाडवळे या निसर्गप्रेमींनी तसेच वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Relief: अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४८० कोटी रुपये मदत जाहीर

Loan Proposals: प्रस्तावही हवेत ‘स्मार्ट’

Pune APMC: पुणे बाजार समितीचे चौकशी समिती अधिकारी बदलले

E-Gokatta: ‘ई-गोकट्टा’ उपक्रमातून देशी गोवंश संवर्धनाचा जागर

Bio Pesticide Conference: ‘राष्ट्रीय जैव कीटकनाशक परिषदे’चे आसाम कृषी विद्यापीठात आयोजन

SCROLL FOR NEXT