Electricity Use : सोलापूर जिल्ह्यात दररोज १२८० मेगावॉट विजेचा वापर

Electricity Update : सोलापूर जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा सरासरी ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचला आहे. शहर आणि ग्रामीण भागांतील घरगुती ग्राहकांसह अनेक शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये ‘एसी’चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
Electricity
ElectricityAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा सरासरी ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचला आहे. शहर आणि ग्रामीण भागांतील घरगुती ग्राहकांसह अनेक शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये ‘एसी’चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दुसरीकडे पंखे, कूलर तर प्रचंड प्रमाणात सुरू आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर विजेची मागणी वाढत असून सध्या सोलापूर शहर-जिल्ह्यात दररोज १२८० मेगावॉट वीज वापर होतो आहे.

जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, माळशिरस, माढा व सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमध्येही दुष्काळाची दाहकता वाढत आहे. जमिनीतील पाणीपातळी खालावल्याने कृषी पंपासाठी विजेचा वापर वाढला असून, उन्हाळ्यामुळे पिकांनाही वारंवार पाणी द्यावे लागत असल्याची स्थिती आहे.

Electricity
Electricity Issue : अथक प्रयत्नानंतर अखेर २८ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत

दुसरीकडे तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने घराबाहेर फिरणे कठीण झाले आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी जिल्हाभरात कूलरची विक्री वाढली असून, घराघरांत टेबल फॅन दिसत आहेत. अनेकांनी घरात एसी बसवून घेतले आहेत. एटीएम केंद्रे, बॅंका, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, साडी सेंटर, कापड दुकानांसह सराफ दुकानांमधील एसी, पंखे दिवसभर सुरूच ठेवावे लागत आहेत.

जिल्ह्यात महावितरणचे ११ लाख ३५ हजारांवर ग्राहक असून त्यात घरगुती ग्राहकांची संख्या साडेसहा लाखांपर्यंत आहे. सध्या शेतीच्या तुलनेत घरगुती ग्राहकांनाच सर्वाधिक वीज लागत असून, जिल्ह्यातील एकूण ग्राहक फेब्रुवारीच्या तुलनेत सध्या ६४ ते ७० मेगावॉट वीज जास्त वापरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Electricity
Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

तीन महिन्यांत सातत्याने मागणी

सोलापूर जिल्ह्यातील गेल्या तीन महिन्यांतील विजेच्या मागणीचा विचार करता, फेब्रुवारीमध्ये १२१६ मेगावॉट विजेची मागणी होती. तर मार्चमध्ये हीच मागणी १२२५ मेगावॉटवर पोहोचली. तर एप्रिलमध्ये त्यात आणखी वाढ झाली. तब्बल १२८० मेगावॉटवर पोहोचली आहे.

जिल्ह्यात लोडशेडिंग नाही

जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता पाहता उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नदी काठावरील वीज सहा तास, तर बंधाऱ्यांजवळील वीजपुरवठा दोन तास करण्यात आली आहे, पण अन्य ठिकाणी पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठा होत आहे. शहर किंवा ग्रामीण भागात सध्या कोणत्याच ठिकाणी लोडशेडिंग होत नाही. मागणीच्या प्रमाणात वीजपुरवठा केला जात असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक अभियंता संजय शिंदे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com