Animal Attack : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात खेडमध्ये १३५ जनावरांचा मृत्यू

Leopard Attack : मार्च २०२३ ते १ एप्रिल २०२४ या आर्थिक वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात खेड तालुक्यातील १३५ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
Animal Attack
Animal AttackAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : मार्च २०२३ ते १ एप्रिल २०२४ या आर्थिक वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात खेड तालुक्यातील १३५ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

वनविभागाच्या वतीने १०८ प्रकरणांमध्ये शासन नियमानुसार ११ लाख ५० हजार ९४१ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली, तर भिवेगाव आणि धुवोली येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींना ५० लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती राजगुरुनगर वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप रौंधळ यांनी दिली. ७१ शेळ्या, २० बोकड, २६ कालवडी, २ पारडे, ६ मेंढ्या, २ घोडे आणि ८ गोऱ्ह्यांचा मृत्यू झाला. वन्यप्राण्यांनी शेतीपिकांचे नुकसान केले होते. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, यासाठी प्रस्ताव वनविभागाकडे दाखल केले होते. त्यानुसार नुकसानभरपाई देण्यात आली.

Animal Attack
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

चास ते बुरसेवाडी परिसरात खरिपातील भुईमूग, सोयाबीन आणि मका पिकाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान झाले होते. ६२ शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार वन कर्मचाऱ्यांनी शेतीपिकांचे घटनास्थळी जाऊन पंचनामे केले. त्याचे प्रस्ताव करून वनविभागाने पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवले होते. या सर्व ६२ नुकसानग्रस्तांना २ लाख ५५ हजार ८२ रुपयांची मदत वनविभागाने दिली आहे.

वनघरे, जठार कुटुंबीयांना ५० लाखांची मदत
भिवेगाव येथे लक्ष्मण वनघरे आणि धुवोली येथे अजय जठार या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. शासन नियमानुसार, संबंधित कुटुंबाला घटना झाल्यावर काही दिवसांत वनविभागाच्या वतीने १० लाख रुपयांची मदत देण्यात आली होती, तर उर्वरित त्यांच्या वारसाच्या नावे पाच लाख पाच वर्षांसाठी व १० लाख १० वर्षांसाठी बँकेत ठेव (एफडी) ठेवण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com