आज आपण कापूस, सोयाबीन, आले, मका आणि भेंडी बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीनमध्ये सुधारणादेशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहिशी सुधारणा दिसून आली. बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव हमीभावावर पोचला आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भावही १०० रुपयाने वाढले होते. आज बाजारातील आवकही काहिशी कमी झालेली आहे. सोयाबीनला आज बाजारात ५ हजार २०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनला सध्या उठाव चांगला आहे. सोयातेलाचेही भाव वाढलेले आहे. तर सोयापेंडलाही चांगली मागणी आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावाला चांगला आधार आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. .कापसाला आधारदेशातील बाजारात कापसाला सध्या चांगला उठाव आहे. युध्दामुळे जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. यामुळे चीन, बांगलादेशसह शेजारच्या काही देशांकडून भारताच्या कापसाला उठाव मिळत आहे. याचा कापूस दराला आधार मिळत आहे. सध्या देशात कापसाची विक्री ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान होत आहे. सीसीआनेही कापूस विक्रीचे भाव वाढवले आहेत. युध्दाचा परिणाम असेपर्यंत कापसाच्या भावाला चांगला आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापुस दरात सुधारणा, कैरीला उठाव, कलिंगडाला मागणी तर तुरीचे दर स्थिरावले.आल्याचे भाव टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आल्याचे भाव टिकून आहेत. बाजारातील आल्याची आवक मर्यादीतच आहे. तर दुसरीकडे आल्याला मागणी आहे. लग्नसराई आणि रमजानमुळे आल्याला उठाव मिळत आहे. यामुळे आल्याचा भाव बाजारात सध्या ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे स्थिर राहण्याची सक्यता आहे. तर आल्याला उठाव चांगला राहण्याची शक्यता आहे. यामुळे आल्याचे भावही टिकून राहतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: केळीचा भाव टिकून; कापूस स्थिरावला, कांदा दबावात, मिरचीला उठाव टिकून तर बेदाण्याला उठाव.मक्याची आवक स्थिरदेशातील बाजारात मक्याची आवक स्थिरावलेली आहे. सध्याची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक आहे. खरिपातील वाढलेल्या उत्पादनामुळे यंदाची आवक सुरुवातीपासूनच अधिक राहीली आहे. तर रब्बी हंगामातही मक्याची लागवड वाढलेली आहे. यामुळे पुढील काळातही मक्याची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. सध्या मका देशातील बाजारात सरासरी १४०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मक्याची आवक पुढील काळातही चांगली राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला यंदा इथेनाॅलकडून कमी उठाव मिळालेली आहे. यामुळे मका भाव आणखी काही दिवस दबावातच राहू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .भेंडीची आवक स्थिरराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून भेंडीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. भेंडीला उठाव मात्र चांगला आहे. भेंडी पिकाला यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. यामुळे बहुतांशी बाजारांमध्ये भेंडीची आवक कमी असून दराला आधार मिळत आहे. सध्या भेंडीला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. भेंडीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्तकेला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.