Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : सांगलीत पणनच्या २ हमीभाव केंद्रांना मंजुरी; शेतकऱ्यांकडून संताप, आंदोलनाचा इशारा

Sangli Market Committee : तासगाव येथील आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघ व सांगलीमधील विष्णू अण्णा पाटील खरेदी-विक्री संघ या दोनच ठिकाणी ही हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

sandeep Shirguppe

Sangli Soybean Market : सांगली जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन विभागाकडून सोयाबीन खरेदीसाठी फक्त २ केंद्रे उभारण्यासाठी मंजुरी दिली. दरम्यान पणन विभागाने अनेक जाचक अटी घातल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने ही हमीभाव केंद्रे घेण्यास टाळाटाळ केली आहे. तासगाव येथील आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघ व सांगलीमधील विष्णू अण्णा पाटील खरेदी-विक्री संघ या दोनच ठिकाणी ही हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

केंद्राकडून ठरलेल्या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी सांगली बाजारसमितीने नाफेडकडे केंद्रे मंजुरीची मागणी केली. परंतु त्यात असलेल्या जाचक अटींमुळे ही खरेदी केंद्रे घेण्यास बाजार समित्यांनी असमर्थता दर्शविली आहे. यामध्ये प्रामुख्याने पाच आणि दहा लाख रुपये डिपॉझिट ठेवणे बंधनकारक करण्यात आले. पणनच्या अ वर्ग सभासद असणाऱ्या संस्थांना यामध्ये प्राधान्य होते. त्यांना डिपॉझिटची अट नव्हती. परंतु त्यांनीही यासाठी नकार दर्शविला आहे.

पणन महासंघाचे लेखाधिकारी संदीप जाधव म्हणाले की, नवीन हमीभाव केंद्राच्या मंजुरीसाठी काही फार्मर प्रोड्यूसर कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यांनी अटींची पूर्तता केल्यास त्यांना हमीभाव केंद्र मिळू शकते. आम्ही याबाबत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळेल याकडे आमचा कल असेल अशी माहिती संदीप जाधव यांनी दिली.

नियम अटींमुळे त्रास

हमीभाव केंद्रावर विक्री करताना नोंदणीसाठी आधारकार्डची प्रत, राष्ट्रीयीकृत बॅंकेचे खाते असलेल्या पासबुकची प्रत व सोयाबीन पिकाची नोंद असलेला ऑनलाईन पीक पेरा व चालू मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी काहीही कचरा नसलेला चाळणी करून सुकवून माल केंद्रावर आणावा. नाफेडच्या एनसीसीएफच्या स्पेसिफिकेशननुसार शेतमालाची तपासणी करण्यात येते, असे पण नियम आहेत. त्यामुळे तोटा सोसूनही शेतकरी खाजगी व्यापाऱ्याकडे वळत असल्याचे मत सोयाबीन उत्पादकांकडून व्यक्त करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT