Farmers Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Subsidy : '५० हजार अनुदान द्या, अन्यथा जिल्हा बँकेसमोर आंदोलन'

Crop Loan : सरकारने पीक कर्जाची नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती.

sandeep Shirguppe

Andolan Ankush Protest : पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रुपये अनुदान द्यावे. पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही तर जिल्हा बँकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुशने दिला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने घोषित केलेली अनुदानाची रक्कम तातडीने मिळावी, या मागणीसाठी आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी काल (ता. २१) शुक्रवारी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली.

आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, पीक कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी मुदतीत करावी या उद्देशाने राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. या अनुदानासाठी पात्र ठरवण्यासाठी अटी, नियम लावून बहुसंख्य शेतकरी या योजनेपासून वंचित कसे राहतील, हे पाहिले गेले.

पंधरा दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास जिल्हा बँकेच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, रशीद मुल्ला, महेश जाधव, संभाजी माने, सोमनाथ तेली, सुरेश चुडापा, अकबर पटेल, दादासो मुसळे, अभय इंगळे, हिराबाई कामते व शेतकरी उपस्थित होते.

कोल्हापूरच्या शेतकऱ्यांवर अन्याय

राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा डिसेंबर २०१९ मध्ये केली होती. गेली चार वर्षे प्रोत्साहन अनुदानाचे गुऱ्हाळ सुरू आहे. राज्यात पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कोल्हापूर जिल्ह्यात अधिक आहे.

त्यामुळे कर्जमाफीपेक्षा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ सर्वाधिक होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारच्या परतफेडीच्या कालावधीने जवळपास एक लाख खातेदार अनुदानापासून वंचित राहिले आहेत. एप्रिल ते मार्च ही परतफेडीचा कालावधी आहे, मात्र कोल्हापुरात ऊस पीक आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम एप्रिल, मेपर्यंत सुरू असतो. त्यामुळे विकास संस्थांच्या पातळीवर जूनअखेर पीक कर्जाची परतफेड केली जाते. त्यामुळे एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा उचल दिसते, ही मुख्य अडचण आहे. अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या सहकार विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयाकडे दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: सवलतीचा संशयकल्लोळ

Baramati Water Crisis: बारामतीचा जिरायत भाग तहानलेला

Digital Mapping: शेत-पाणंद रस्त्यांचे ‘डिजिटल मॅपिंग’

Farmers Support: आंदोलन सुरू असले तरी शेतकऱ्यांना सेवा सुरूच; आकृतिबंध रद्दसाठी लढा सुरू; कृषी सेवा महासंघाची माहिती

NCP Meeting 2026: दुष्काळी स्थितीवर राष्ट्रवादीची बैठक; मुंबईत २८ सप्टेंबरला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा

SCROLL FOR NEXT