Jeera Cultivaton Agrowon
ॲग्रो विशेष

Jeera Cultivation : संगमनेर तालुक्यात यंदा जिरा लागवडीचा प्रयोग

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : गेल्यावर्षी सुधारित जातीच्या मटकीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कृषी विभागाने ‘आत्मा’च्या पुढाकारातून यंदा संगमनेरमधील चार गावांत तीन एकरावर जिरा लागवडीचा प्रयोग केला आहे. आत्मा कडून शेतकऱ्यांना यासाठी बियाणे मोफत दिले असून कृषी विभागाचे अधिकारी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करत आहेत.

गुजरात, राजस्थानातील जिरा हे पीक आहे. तेथील वातावरणामुळे हे मसालावर्गिय पीक चांगले येते. संगमनेर, अकोले भागातील वातावरण त्यासी काहीसे जुळते असल्याने येथेही हे पीक येईल या हेतूने यंदा संगमनेर तालुक्यातील निमज, कोळवाडे, चंदनापुरी, निमगाव भोजापूर या गावांत कृषी विभागाने आत्मा अंतर्गत असलेल्या शेतकरी गटामार्फत तीन एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर लागवड केलेली असून एक महिन्याच्या या जिरा पिकाची चांगल्याप्रकारे उगवण झाली आहे. अजमेर येथील मसाला वर्गीय पीक संशोधन केंद्राकडून कृषी विभागाने बियाणे उपलब्ध केलेले असून ते शेतकऱ्यांना आत्मा अंतर्गत मोफत दिले आहे.

एकशे दहा दिवसाचे हे पीक असून हेक्टरी ८ ते १० क्विंटल गुजरात, राजस्थानमध्ये उत्पादन निघते, त्या प्रमाणेच येथेही पाच क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन कृषी विभागाला अपेक्षित आहे. कमी पाण्यावर (११० दिवसात तीन वेळा पाणी द्यावे लागते) आणि कमी खर्चातील हे पीक आहे. सध्या बाजारात जिऱ्याला ६० ते ८० हजार रुपये क्विंटल दर आहे.

राज्यात कृषी विभागामार्फत अशी पहिल्यांदाच लागवड झाली आहे. महिनाभराच्या असलेल्या या पिकाची उपविभागीय अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व मंडळ कृषी अधिकारी पंकज कवाड यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मटकीचा प्रयोग यशस्वी

गेल्या दोन वर्षात अकोले, संगमनेर भागात पहिल्यांदाच ६० ते ६५ दिवसात येणाऱ्या सुधारित वाणाच्या मटकीची ४० एकरावर लागवड केली होती. ही मटकीची झाडे उभी येत असल्याने ती यंत्राने काढता येते.

मटकीचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनी यंदा १२५ ते १५० रुपये किलो दराने बियाण्यांसाठी या मटकीची विक्री केली. मटकीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता कृषी विभागाकडून जिरा लागवडीचाही पहिल्यांदाच प्रयोग केला असल्याचे ‘आत्मा‘चे तालुका व्यवस्थापक वैभव कानवडे यांनी सांगितले.

कृषी विभागाकडून संगमनेर, अकोले तालुक्यात सातत्याने वेगवेगळे प्रयोग करून शेतीला पर्यायी पीक देण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्यावर्षी सुधारित वाणांच्या मटकी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला. यंदा तीन एकरावर शेतकरी गटातील सदस्यांमार्फत जिरा लागवडीचा प्रयोग केला आहे. सध्या जिरा पिकाची स्थिती चांगली आहे. हा प्रयोगही यशस्वी होईल.
- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, संगमनेर (जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT