Latur Farmers Fodder Shortage: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पीक तर हातातून गेले आणि आता त्यांच्यापुढे पशुधन वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. चारा टंचाईच्या गंभीर समस्येमुळे ते आता उभ्या ऊस पिकाची तोडणी करुन भुकेल्या जनावरांना खाऊ घालत आहेत. ऊस पिकातून मिळणारा पैसा आणि पशुधन तातडीने जगवणे, यांपैकी एकच पर्याय निवडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे..अपुऱ्या पावसामुळे पिके करपली. हिरावा चाराही नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जनावरांना जगवण्यासाठी उसासारख्या नगदी पिकांवर कोयता लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे येथील शेती अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका बसत असल्याचे दिसून येते. .सरकारने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला. तसेच कर्ज वसुलीला स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्गठन, जमीन महसुलात सवलत व वीज बिलांवर अनुदान यांसारखे उपाययोजना जाहीर केल्या आहेत. .Fodder Transport Ban : चारा वाहतूक, विक्रीला बंदी.लातूर जिल्ह्यातील कव्हा गावातील शेतकरी नारायण गुडे यांनी, चाऱ्याच्या टंचाईमुळे त्यांच्या उभ्या ऊस पिकाची तोडणी करुन तो जनावरांना खाऊ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांची सात एकर शेती आहे. त्यांच्या गोठ्यात ७ म्हशी, २ गाई व काही वासरे आहेत. त्यांना जगवणे हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे. .Maharashtra Fodder Shortage: राज्यात चाराटंचाई; उसावर मदार."पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उभ्या ऊस पिकाची तोडणी करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चारा कमी पडू लागल्याने दूध उत्पादन घटू लागले आहे. त्यांच्याकडील जनावरांचे दररोजच्या दुधाचे प्रमाण केवळ १० ते १२ लिटरवर आले आहे. यामुळे ते चिंतेत आहेत. .जनावरांच्या खाद्यासाठी दररोज जवळपास अर्धा टन ऊस लागतो. असे गुडे सांगतात. पाऊस नसल्यामुळे इतर खरीप पिके करपून गेली आहेत. सोयाबीन पीक त्यांच्या हाती लागलेले नाही. यंदा प्रति एकर अर्ध्या क्विंटलही उत्पादन मिळणार नाही, अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले. .आता करपलेल्या सोयाबीन पिकाचे अवशेष आणि ऊस पीक, याचा चारा म्हणून वापर करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. पशुधन वाचवण्याची गरज असून, राज्य सरकारने तत्त्काळ अधिकृत चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली..दूध उत्पादनात घटपीक उत्पादनात मोठी घट झाली असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पशुधन हा एकमेव आर्थिक आधार आहे. पण, चारा आणि पाणी टंचाईमुळे दूध उत्पादनात मोठी घट होऊ लागली आहे. यामुळे शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय आणि त्यातून मिळणारे उत्पन्न, दोन्ही धोक्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.