Market Yard : अहिल्यानगर भाजीपाला बाजारात भाज्या, फळे खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या मोबाईल व अन्य साहित्य लक्ष्य करून चोरी केली जात आहे. चोरट्यांकडून भाजीपाला बाजारासह गर्दीची ठिकाणे लक्ष्य केली जात असल्याने भाजीपाला विक्रेते शेतकरी आणि ग्राहक बेजार झाले आहे. शिर्डीत दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेले तब्बल साडेअठरा लाख रुपये किमतीचे ५५ मोबाईल व अन्य साहित्य पकडले असून ते आठवडी बाजार, भाजीपाला बाजार व गर्दीची ठिकाणाहून चोरल्याचे उघड झाले आहे..जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातील आठवडी बाजार, शहरातील जागोजागी असलेले भाजीपाला बाजार तसेच गर्दीच्या ठिकाणाहून चोऱ्या होत असल्याचे प्रकार सुरू आहेत. अहिल्यानगर येथे ‘एमआयडीसी’ भागात मनमाड रस्त्यावर मोठा भाजीपाला, फळांचा बाजार भरतो. अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, नेवासा तालुक्यांतील शेतकरी येथे भाजीपाला विक्रीला आणतात. .Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड.मात्र काही दिवसांपासून येथून मोबाइलसह अन्य साहित्याची चोरीचे प्रकार घडत आहेत. भाजीपाला, फळांच्या खरेदीला आलेले ग्राहक, विक्रीसाठी आलेले शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसत असल्याने बेजार झाले आहेत. चार दिवसांपूर्वी येथून एक महागडा मोबाईल चोरी झाला होता. मोबाईल सुरू केल्यावर अहिल्यानगर येथील सायबर विभागातील राहुल गुंडु यांना लोकेशन मिळत होते. मिळणारे लोकेशन शिर्डीमधील होते. ज्यांचा मोबाईल चोरीला गेला त्यांनी पोलिसांशी संपर्क केल्याने व तेथील पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी व त्यांच्या पोलिस सहकाऱ्यांनी तांत्रिक तपास सुरू ठेवल्याने लोकेशन मिळालेल्या ठिकाणी एका खोलीत आठवडी बाजार, भाजीपाला बाजार व गर्दीची ठिकाणाहून साडेअठरा लाख रुपये किमतीचे ५५ मोबाईल व अन्य साहित्य पकडले. हे शेतकरी, ग्राहकांचे असल्याचे उघड झाले आहे. .Paddy Farming Crisis: मुळशी तालुक्यात भातपिकावर दुहेरी संकट.पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी गलांडे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. अहिल्यानगर शहरासह राहाता, राहुरी, कोपरगाव, लोणी, नेवासा, पारनेर, संगमनेर, शेवगाव, पाथर्डी येथील आठवडी बाजार, गर्दीच्या ठिकाणाहून चोरी करत शेतकरी, सामान्य नागरिकांना बेजार करणाऱ्या स्थानिक व परप्रातीय चोरट्यांचा बंदोबस्त होणार की अशाच चोऱ्या सुरू राहणार, असा प्रश्न शेतकऱ्यांत उपस्थित होत आहे..थेट नेपाळला विक्रीशहरात जागोजागी असलेले भाजीपाला बाजार, ग्रामीण भागातील आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणी लक्ष्य करून मोबाईल, पिशव्या व अन्य साहित्य चोरणारे परप्रांतीय असल्याचे दिसत आहे. शिर्डीत सापडलेले साहित्य चोरणारे पळून गेले असले तरी त्यांच्या खोलीत सापडलेल्या साहित्यावरून ते झारखंड राज्यातील असल्याचे स्पष्ट झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील आठवडी बाजार, भाजीपाला बाजार व गर्दीची ठिकाणे परप्रांतीय चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे दिसत आहे. ‘आयएमईआय’ नंबरवरुन मोबाईल शोधले जात असल्याने चोरलेले मोबाईल थेट नेपाळ ला विकले जात असल्याचे एका पोलिसाने सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.