Jeera Market : जिरा पोचला ६२ हजारांवर; भाव आणखी वाढणार?

Jeera Market Update : जिरा बाजारातील तेजी वाढत आहे. चालू हंगामात देशातील जिरा उत्पादन कमी झाले. त्यातच जिऱ्याला निर्यातीसाठी मागणीही चांगली आहे.
Jeera
JeeraAgrowon
Published on
Updated on

Pune News : जिरा बाजारातील तेजी वाढत आहे. चालू हंगामात देशातील जिरा उत्पादन कमी झाले. त्यातच जिऱ्याला निर्यातीसाठी मागणीही चांगली आहे. त्यामुळे दरात आणखी सुधारणा होण्याचा अंदाज आहे. पण दरात चढ उतारही दिसू शकतात. तर जाणकारांच्या मते, ऑगस्टनंतर जिऱ्याच्या दरातील तेजी कमी होऊ शकते.

मसाल्यामध्ये सध्या हळद, जिऱ्यामध्ये चांगली तेजी आली आहे. त्यातही जिऱ्यातील तेजीला चांगला आधार आहे. मागील महिनाभरातच जिऱ्याच्या बावात १३ टक्क्यांची सुधारणा दिसली. तर मागील सहा महिन्यांत दर ९० टक्क्यांनी वाढलेे आहेत.

वायद्यांमध्ये जिऱ्याच्या भावाने ६१ हजार रुपये प्रतिक्विंटलचाही टप्पा पार केला. जिऱ्याच्या ऑगस्ट वायद्यांनी आज ६१ हजार ६०० रुपयांचा टप्पा गाठला होता. तर सप्टेंबरचे वायदे ६२ हजार ५५० रुपयांपर्यंत पोचले होते. जिऱ्याच्या वायद्यांमध्ये आजही मोठे चढ उतार पाहायला मिळाले.

Jeera
Jeera Market : जिऱ्याचे भाव का वाढले?

बाजार समित्यांमध्येही जिऱ्याची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे जिऱ्याला चांगला भाव मिळत आहे. सध्या गुजरातमधील उंजा आणि राजस्थानमधील जोधपूर बाजारात जिऱ्याची आवक सर्वाधिक दिसते. पण सध्याची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे.

बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ५२ हजार ५०० ते ५६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. जिऱ्याची बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Jeera
Jeera Market Rate : जिऱ्याचा भाव क्विंटलला ५५ हजारांवर

जिऱ्याचे भाव आणखी काही दिवस तेजीत राहण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जिऱ्याचे वायदे लवकरच ६५ हजार रुपयांचा टप्पा गाठू शकतात, असा अंदाज काही विश्लेषक व्यक्त करत आहेत.

तर काही जणांच्या मते, जिरा ७० हजारांची पातळीही गाठू शकतात. पण या भावपातळीवर बाजारात अनिश्चितता दिसू शकते. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी तसेच गुंतवणुकदारांनी काळजीपूर्वक व्यवहार करावेत, असा सल्ला देण्यात येत आहे.

ऑगस्टनंतर जिऱ्याच्या दरातील तेजीवर मर्यादा येण्याचा अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत जिरा बाजारात सर्वच घटकांचा परिणाम दिसेल. त्यामुळे आतापर्यंत ज्या प्रमाणात तेजी आली त्यावर लगाम येऊ शकतो. पण जिऱ्याचे भाव दबावात येण्याची शक्यता तूर्त नाही. ऑगस्टमध्ये जिरा लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल समजू शकतो.

सध्या जिरा तेजीत असल्याने शेतकरी यंदा लागवड वाढवू शकतात. पण जिऱ्याचं नवं पीक मार्चपासून बाजारात येईल. त्यानंतरच दरात नरमाई येण्यास सुरुवात होईल, असेही विश्लेषकांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com