Us-India Trade War Agrowon
ॲग्रो विशेष

India-US Relation: दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत

American Support: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती देण्यासाठी खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री ख्रिस्तोफर लँडाऊ यांनी भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शवला.

Team Agrowon

Washington News: दहशतवादाविरुद्धच्या लढ्यामध्ये अमेरिका भारताबरोबर खंबीरपणे उभी आहे, अशी हमी अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री ख्रिस्तोफर लँडाऊ यांनी भारतीय शिष्टमंडळाला दिली.

पहलगाममधील हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ याविषयी भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील खासदारांचे शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचले आहे. त्यांनी लँडाऊ यांची भेट घेतली.

या भेटीमध्ये खूपच शिष्टमंडळाने अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री लँडाऊ यांच्याशी मनमोकळा संवाद साधला, असे भारतीय दूतावासाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तर, ‘भारतीय लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर खूपच चांगली चर्चा झाली.

दोन्ही देशांमधील व्यापार व वाणिज्य संबंध वाढविण्यासह सामरिक भागीदारीविषयी चर्चा करण्यात आली,’ असे लँडाऊ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यामध्ये अमेरिका भारताबरोबर खंबीरपणे उभी आहे, याची पुन्हा एकदा हमी दिली आहे,

असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. दोन्ही बाजूंमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यात परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवत, द्वीपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला, असे यात नमूद करण्यात आले आहे.

या चर्चेमध्ये भारतीय शिष्टमंडळाने पहलगाममधील हल्ल्याची आणि त्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Legislative Assembly Protest: कर्जमाफी, हमीभावावरून विरोधक आक्रमक

Hapus GI Tag: कोकण व्यतिरिक्त कोणत्याच आंब्याला हापूस मानांकन नको

SIR Campaign: ‘एसआयआर’चा निवडणूक आयोगाला अधिकार नाही

Purandar Airport Project: पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधितांशी चर्चा

IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांची चौकशी

SCROLL FOR NEXT