Soybean Tariff War: चीन-अमेरिका सोयाबीन बाजाराचा खेळ बिघडवणार का?

US-China Trade: चीनने अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर १०% शुल्क लावल्याने जागतिक बाजारात खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या शेतकऱ्यांना फटका बसणार का, ब्राझीलला संधी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
America Vs China Trade War
America Vs China Trade WarAgrowon
Published on
Updated on

Pune News: चीनने अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर १० टक्के शुल्क लावले. याचा परिणाम केवळ अमेरिकाच नाही तर जागतिक बाजारावरही दिसत आहे. पण अमेरिकेच्या सोयाबीनच्या विक्रीचा महत्वाचा कालावधी संपला आहे. अमेरिकेवर आयात शुल्कामुळे ब्राझीलमधून चीनची आयात वाढणार आहे. त्यामुळे याचा परिणाम अल्पकालावधीत तेवढा होण्याची शक्यता कमीच असली तरी दीर्घकाळात मात्र याचा परिणाम दोन्ही देशांना भोगावे लागू शकतात, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाॅरचा फटका अमेरिकेच्या शेतीला सध्यातरी बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला उत्तर देताना चीनने देखील अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर १० टक्के शुल्क लागू केले. अमेरिकेत सोयाबीनवर प्रक्रिया कमी होते. सोयाबीनची निर्यात जास्त होते. अमेरिकेच्या एकूण निर्यातीपैकी आजही चीनला ३० टक्के निर्यात केली जाते. आता चीनने अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर १० टक्के शुल्क लागू केले. मात्र अमेरिकेच्या २०२४ मधील सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. चीनचा अमेरिकेच्या सोयाबीन आयातीचा कालावधी आता जवळपास संपला.

America Vs China Trade War
America Canada Trade War: ट्रम्प यांची खेळी अमेरिकेच्याच शेतकरी, ग्राहकांच्या अंगलट; आयाशुल्क वाढीमुळे भाव वाढले, निर्यातीवरही परिणाम

चीनच्या १० टक्के आयात शुल्काचा अमेरिकेच्या सोयाबीन बाजारावर म्हणावा तेवढा परिणाम चालू हंगामात, अल्प कालावधीत तरी मोठा परिणाम जाणवणार नाही. त्याची दोन कारणे आहे. एक म्हणजे, अमेरिकेच्या सोयाबीन काढणीचा हंगाम संपलेला आहे. आता ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या सोयाबीनचा हंगाम सुरु आहे. दुसरे म्हणजे चीनची अमेरिकेच्या सोयाबीनची मागणी केमी झालेली आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.४) चीनने आयात कर लागू केल्यानंतर अमेरिकेच्या सोयाबीन बाजारात काहीशी नरमाई आली. मात्र दर आज (बुधावर ता.५) पुन्हा १० डाॅलरच्या पुढे सरकले होते. पण ही परिस्थिती कायम राहीली तर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, असा इशारा अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

America Vs China Trade War
Soybean Rate: सोयाबीनचे भाव खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्याने वाढतील का? 

चीनने सोयाबीनवर १० टक्के शुल्क लावल्यानंतर अमेरिकेतून होणारी आयात कमी होईल. यामुळे सोयाबीनसाठी ब्राझीलवरील चीनचे अवलंबित्व वाढत जाईल. ब्राझीलमधील उत्पादन मागील काही वर्षांपासून वाढतच आहे. जागतिक बाजारात यंदाही सोयाबीनचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे चीनची केवळ सोयाबीनच नाही तर मका आणि गव्हाची देखील मागणी जागतिक बाजारातून पूर्ण होईल, असे चीनच्या आयातदारांचे म्हणणे आहे. ब्राझीच्या सोयाबीनची चालू हंगामातील चीनमध्ये आयात म्हणावी तशी सुरु झाली नाही. दुसऱ्या तिमाहीत आयात वाढेल. गहू ऑस्ट्रेलियातून उपलब्ध होऊ शकतो. २०१८ मध्ये चीनने २५ टक्के शुल्क लावले होते. त्यामुळे आता चीनने १० टक्के लावलेले शुल्क परिस्थितीनुसार वाढूही शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण त्यावेळी सोयाबीनमधून चीन आणि अमेरिका दोन्ही देशांना धडा मिळाला होता. 

अमेरिका चीनच्या मालावर आयात शुल्क लावत असेल तर त्याचा फटका अमेरिकेलाही बसलेच, कारण चीनचा स्वस्त माल महाग झाल्यास महागाई वाढेल. तसेच चीन काही शेतीमालाचा मोठा ग्राहक असल्याने चीनने अमेरिकेच्या मालावर आयात कर लावल्यास त्याचा परिणाम चीनवरही होणार आहे. पण या टॅरिफ वाॅरचा परिणाम चीनपेक्षा अमेरिकेवर जास्त होईल, असा सूर आहे. पण या दोन देशांमधील टॅरिफ वाॅरचा परिणाम जागतिक बाजारावर दिसणार हे मात्र नक्की. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com