Farewell Ceremony Agrowon
ॲग्रो विशेष

Ambadas Danve: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निवृत्त

Maharashtra Politics: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ बुधवारी पार पडला असला, तरी अद्याप ४४ दिवसांचा कालावधी त्यांच्याकडे आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ बुधवारी पार पडला असला, तरी अद्याप ४४ दिवसांचा कालावधी त्यांच्याकडे आहे. श्री. दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने ते निवृत्त होत असून काँग्रेसच्या सतेज पाटील यांना संधी देण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, पुढील अधिवेशनापर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, श्री. दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव देत सूचक वक्तव्य केले. श्री. फडणवीस यांनी भाषणात श्री. ठाकरेंवर थेट निशाणा साधत म्हटले, की ठाकरे साहेब, आता २०२९ पर्यंत तुम्ही काही करायचे नाही म्हणता.

पण आमचे तिकडे जाण्याचे दार बंद झाले आहेत. मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू शकतो. दानवे भाजपमध्ये घडलेले नेते आहेत. ते जरी आत्ता ठाकरे गटात असले, तरी त्यांच्या मुळाशी भाजपच आहे. शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष आहे, पण काही गोष्टी बदलल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचत, दानवे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाहीत. ते स्वकर्तृत्वाने विरोधी पक्षनेतेपदापर्यंत पोहोचले आहेत, असा टोला लगावला. यानंतर ठाकरे यांनी दानवे हे मूळ भाजपचे होते, पण आमचे अनेकजण तुम्ही घेतले. अनेकजण पदे घेण्यासाठी फडफडत असतात. दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत, पण भरल्या ताटाशी त्यांनी प्रतारणा केली नाहीत. ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाशी प्रतारणा केली नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला.

सतेज पाटील यांना प्रतीक्षा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद ४४ दिवसांनी रिक्त होणार असून पुढील अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाची निवड होण्याची शक्यता आहे. सध्या विधान परिषदेत काँग्रेसची सदस्यसंख्या जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेकडून ते काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचे सतेज पाटील हे दावेदार असून त्यांच्या निवडीसाठी पत्र दिले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Egg Rate: अंडीदर कोसळल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

Agrowon Exhibition 2026: शेतकऱ्यांची मांदियाळी एकवटली!

Onion Rate: कांद्याला १८०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर

Vidarbha Irriagation Project: विदर्भातील सिंचन प्रकल्प निधीच्या दुष्काळामुळे कोरडे

Winter Weather Forecast: तापमानात चढ-उतार शक्य; गारठा कायम

SCROLL FOR NEXT