Pandharpur Yatra : उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पंढरपुरातील तयारीचा आढावा

Eknath Shinde : मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Pandharpur News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. ३) आषाढी वारीच्या तयारीचा पंढरपुरात येऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे, त्यांना कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी थेट पदस्पर्श दर्शन टाळत मुखदर्शन घेतले.

मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, या कामांची पाहणी त्यांनी केली.

तसेच अध्यक्ष औसेकर महाराज यांच्या कडूनही अधिकची माहिती जाणून घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आमदार समाधान आवताडे, राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राजेंद्र शेळके, मनोज श्रोत्री यावेळी उपस्थित होते.

Eknath Shinde
Ashadhi Wari 2025 : महिला शेतकऱ्यांकडून वारकऱ्यांना पुरणपोळीचे गोड जेवण

चौफाळा ते मंदिर उपमुख्यमंत्री गेले चालत चौफळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राजशिष्टाचारा नुसार अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समिती मार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली.

Eknath Shinde
Ashadhi Wari 2025: खुडूस फाटा येथे गोल रिंगणावेळी माऊली-माऊली नामजपाचा गजर

परंतु उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेत, भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी चौफाळा ते मंदिरापर्यंतही ते चालत गेले.

वारकरी हेच व्हीआयपी

पंढरपुरात प्रशासनाच्यावतीने पुरवण्यात आलेल्या विविध सोई-सुविधांसह सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही व्हीआयपी नसून, आमच्यासाठी वारकरी हाच व्हीआयपी आहे, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com