Mallikarjun Kharge Agrowon
ॲग्रो विशेष

Narendra Modi Sea Photo: मणिपूरचाही दौरा करा; कॉँग्रेस अध्यक्ष खरगेंचा मोदींना सल्ला!

मोदीजी लक्षद्वीपमध्ये जाऊन पाण्यात उभे राहू शकतात, तर मणिपूरमध्ये जाऊन लोकांना समजून सांगू शकत नाहीत का?" असा थेट प्रश्न खरगे यांनी उपस्थित केला आहे.

Dhananjay Sanap

लक्षद्वीपला जाऊन समुद्रात फोटो काढणारे महापुरुष मणिपूरला का गेले नाही? असा प्रश्न उपस्थित करत कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर शनिवारी (ता.६) खोचक शब्दात टीका केली. "किती दिवस या व्यक्तीचा (नरेंद्र मोदी) चेहरा रोज उठलं की पाहायचा?" असा सवाल मिश्किल सवालही खरगे यांनी उपस्थित केला.

"जिथे लोक मरत आहेत, जिथे महिलांवर बलात्कार केले जात आहेत, या लोकांची विचारपूस करायला ते (मोदी) जात नाहीत. असं का? मणिपूर देशाचा भाग नाही का? मोदीजी लक्षद्वीपमध्ये जाऊन पाण्यात उभे राहू शकतात, तर मणिपूरमध्ये जाऊन लोकांना समजून सांगू शकत नाहीत का?" असा थेट प्रश्न खरगे यांनी उपस्थित केला आहे. अलीकडेच मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला. या दौऱ्या दरम्यान मोदींचे समुद्र किनाऱ्यांवरील फोटो व्हायरल झाले.

नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचाही दौरा करावा, असा सल्लाही खरगे यांनी दिला. ते म्हणाले, "नरेंद्र मोदी नेहमी सांगत असतात की, देशात मी एकमेव नेता आहे, ज्याला विरोधीपक्षसुद्धा रोखू शकत नाही. जर एक मोदी पुरेसे आहेत, तर मणिपूरमध्ये जाऊन का बघत नाहीत. मणिपूर देशाचा भाग आहे. याबद्दलची जनजागृती करण्यासाठी कॉँग्रेस आता मुंबई ते इंफाळ अशी यात्रा काढणार आहे."

खरगे यांनी पंतप्रधानांच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली. ते म्हणाले. "राष्ट्रीय समस्यांवर ज्या बेजबाबदार पद्धतीने काम करणं सुरू आहे, ते योग्य नाही," असंही खरगे म्हणाले. दरम्यान मणिपूरमधील हिंसाचारामध्ये अनेकांचे प्राण गमवावे लागले होते. त्यावरून कॉँग्रेसने केंद्र सरकारने धारेवर धरले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Damage : सोयाबीनच्या शेंगा झाडावरच वाळू लागल्या

Mumbai APMC : मुंबई बाजार समितीमध्ये साचले कचऱ्याचे ढीग

Ration Card e-KYC : दोन लाख ८७ हजारांवर लाभार्थी स्वस्त धान्यास मुकण्याची शक्यता

Boragaon Anjanpur Barrage : बोरगाव-अंजनपूर बॅरेजेच्या दुरुस्तीला चौदा कोटी

Sugarcane Crushing Season : कर्नाटकात जाणाऱ्या उसाबाबत तोडगा काढू

SCROLL FOR NEXT