Ethanol Production agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : इथेनॉलप्रश्नी केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे प्रश्न सुटणार का?

Sugar Industry : केंद्राने आठवड्यापूर्वी ऊस रस, सिरप व साखरेपासून इथेनॉल निर्मितीला प्रतिबंध घातल्यानंतर शुक्रवारी (ता.१५) एक पाऊल मागे घेतले. केंद्राने आता १७ लाख टन साखर बनू शकेल एवढा उसाचा रस किंवा सीरपपासून इथेनॉल निर्मितीची परवानगी दिली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

New Delhi News : केंद्राने आठवड्यापूर्वी ऊस रस, सिरप व साखरेपासून इथेनॉल निर्मितीला प्रतिबंध घातल्यानंतर शुक्रवारी (ता.१५) एक पाऊल मागे घेत १७ लाख टन साखर १७ लाख टन साखर बनू शकेल एवढ्या उसाचा रस किंवा सीरपपासून इथेनॉल उत्पादनाची परवानगी दिली आहे. अन्न मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी वृत्तसंस्‍थेशी बोलताना ही माहिती दिली. परंतु यामुळे अंशतः दिलासा मिळणार असून मूळ प्रश्न सुटणार नाही, असे साखर उद्योगातील जाणकारांनी सांगितले.

दरम्यान याबाबत अभ्यास करून केंद्र परिपत्रक काढणार असल्याने त्यातील तपशील पाहूनच उद्योगाला नेमका किती फायदा होईल, या बाबत स्पष्टता येईल, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे.

संभाव्य साखर टंचाई लक्षात घेऊन केंद्राने ७ डिसेंबरला उसाचा रस आणि सिरप पासून थेट इथेनॉल उत्पादन करण्यास या हंगामासाठी बंदी घातली. त्यामुळे साखर उद्योग क्षेत्रात नाराजी होती. निर्णय मागे घेण्यासाठी दबाव आणला जात होता.

मंत्र्यांच्या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार १७ लाख टन साखर बनू शकेल एवढा उसाचा रस किंवा सीरपपासून थेट इथेनॉल उत्पादन होईल, तसेच ‘बी हेवी मोलॅसिस’पासूनही अतिरिक्त इथेनॉल उत्पादन घेता येणार आहे.

मात्र रस, सिरप, मोलॅसिसचे किती प्रमाण असेल हे सरकारच्या नव्या आदेशात स्पष्‍ट होईल. यामुळे साखर उद्योगाला अंशतः दिलासा असेच या निर्णयाबाबत म्हणता येईल, असे साखर कारखान्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

दरम्यान, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने शुक्रवारी साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, तेल विपणन कंपन्या प्रत्येक डिस्टिलरीला आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी उसाचा रस आणि ‘बी हेवी मोलॅसिस’ आधारित इथेनॉलचे सुधारित प्रस्ताव सादर करतील आणि त्यानंतर याबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाला सूचित केले जाईल.

तेल कंपन्यांकडून सुधारित इथेनॉल मागणी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर, सर्व साखर कारखाने आणि डिस्टिलरीज इथेनॉलचा पुरवठा काटेकोरपणे करतील. ‘रेक्टिफाइड स्पिरिट’, ‘एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल’च्या उत्पादनासाठी उसाचा रस आणि ‘बी हेवी मोलॅसिस वापरण्याची परवानगी नाही.

सर्व मोलॅसिस आधारित डिस्टिलरीज ‘सी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल बनवण्याचा प्रयत्न करतील. एकूण १७ लाख टन साखर वळविण्याच्या मर्यादेत उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिस या दोन्हींचा वापर करण्यास सूट देण्यात आली आहे. देशाचा हंगाम सुरू होऊन दोन महिन्‍याचा कालावधी झाला आहे. या कालावधीत काही प्रमाणात इथेनॉल तयार झाले आहे. याचा आढावा घेण्यात येईल.

थोडक्यात महत्त्वाचे...

-‘बी हेवी मोलॅसिस’पासूनही अतिरिक्त इथेनॉल उत्पादन घेता येणार

- तेल विपणन कंपन्या डिस्टिलरीला सुधारित प्रस्ताव देणार

- मात्र रस, सिरप, मोलॅसिसचे किती प्रमाण असेल हे सरकारच्या नव्या आदेशातून होणार स्पष्‍ट

- यंदाच्या सुरू हंगामातील काही प्रमाणात तयार झालेल्या इथेनॉलचा आढावा घेतला जाणार

- साखर कारखान्यांसाठी हा निर्णय अंशतः दिलासा देणारा असल्याचे तज्ज्ञांचे मत

साखर कारखान्यांसाठी हा निर्णय अंशतः दिलासा देणारा आहे. हंगाम सुरू झाल्‍यापासून आतापर्यंत किती साखर, उसाचा रस, सिरप इथेनॉलकडे वळविण्यात आला याचा अभ्यास केंद्राकडून विविध पातळीवरून होईल. यासाठी केंद्राने कारखान्‍यांकडून इथेनॉल निर्मितीचा तपशील मागविला आहे. यासाठी साधारणपणे आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
- प्रकाश नाईकनवरे, व्‍यवस्थापकीय संचालक, राष्‍ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : राज्यात पाच वर्षात १०० टक्के शेत रस्ते पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन; महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती

Rural Motivational Story: अंदळदेवचे ‘लक्ष्मीदार’ सोमा आणि सखू!

Rain Update : नगरमध्ये मुर पाऊस, पिकांना दिलासा

Soybean Crop Disease: सोयाबीन पिकावरील खोडमाशी व्यवस्थापन

Plant Nursery Business: रोपवाटिका व्यवसायाची उलाढाल पोहोचली अडीच कोटींवर!

SCROLL FOR NEXT