Maize Market
Maize MarketAgrowon

Ethanol Project : धान्याअभावी इथेनॉल प्रकल्प अडचणीत

Ethanol Production : धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पधारकांनी इथेनॉल प्रकल्पांना पुरेसे धान्य उपलब्ध करून देण्‍याची मागणी केली आहे.
Published on

Kolhapur News : धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पधारकांनी इथेनॉल प्रकल्पांना पुरेसे धान्य उपलब्ध करून देण्‍याची मागणी केली आहे. ग्रेन इथेनॉल मॅन्‍युफॅक्चर्स असोसिएशनने पेट्रोलियम मंत्रालयाला याबाबतचे निवेदन दिले आहे.

जुलैमध्ये भारतीय अन्‍न महामंडळाकडून (एफसीआय) इथेनॉलसाठी प्रकल्पांना होणारा तांदळाचा पुरवठा बंद केला होता. या निर्णयानंतर धान्‍य आधारित इथेनॉल प्रकल्‍प अडचणीत आले होते. या प्रकल्पांना कच्चा माल न मिळाल्‍याने याचा परिणाम इथेनॉल निर्मितीवरही झाला असल्‍याचे असोसिएशनने म्हटले आहे.

ऊस रस, सिरप अन् साखरेपासून इथेनॉल निर्मितीला प्रतिबंध घातल्यानंतर असोसिएशनच्या मागणीने पुन्हा इथेनॉल निर्मिती व उपलब्धतेचा प्रश्न ऐरणावर आला आहे. तांदळावर बंदी आणल्‍यानंतर या प्रकल्पांनी मक्यापासून इथेनॉल तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. पण इतक्या मोठ्या प्रमाणात मक्यापासून इथेनॉल तयार करण्याबाबत मर्यादा आल्या होत्या.

Maize Market
Ethanol Production : इथेनॉलमुळे मक्याला चांगले दिवस येणार?

शासनाने पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या एजन्सीमार्फत मका खरेदी करण्याबाबत सांगितले होते. पण त्यांच्यांकडून कमी प्रमाणात १ लाख टनांपर्यंतच मक्याची उपलब्धता होत आहे. या इथेनॉल वर्षामध्ये इतक्या कमी प्रमाणात मक्‍याची उपलब्धता असल्याने अपेक्षित इथेनॉलचे उत्पादन होऊ शकत नसल्याची स्‍थिती आहे.

Maize Market
Ethanol Production Ban : ‘सी हेवी मोलॅसीस’पासून इथेनॉलचा पर्याय शोधा

‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ यांना किमान १० ते १५ लाख टन मक्‍याचा पुरवठा करण्याचे उद्दीष्ट दिले पाहिजे. तरच देशभरातील प्रकल्पांना योग्य त्या प्रमाणात मक्‍याचा पुरवठा होऊन अपेक्षित इथेनॉल निर्मिती होऊ शकेल. या शिवाय या एजन्सीकडून आकारण्‍यात येणाऱ्या किंमती बाबतीत बी लवचिक धोरण स्विकारण्याची गरज आहे.

केंद्राने नुकतेच तांदळाचा १०० मिलियन टनांचा अतिरिक्त साठा असल्याचे सांगितले आहे. जर तांदळाचा अतिरिक्त साठा असेल तर त्यातील २० ते ३० टक्के तांदूळ तातडीने इथेनॉल प्रकल्पांना उपलब्‍ध करून द्यावा जेणेकरून प्रकल्पांना होणारा कच्च्या मालाचा पुरवठा योग्य प्रमाणात होऊ शकेल. या बाबत तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, असेही असोसिएशनने पत्रात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com