Advance Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : सोयाबीनच्या अग्रिम पीकविम्याचे वाटप रखडले

Team Agrowon

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन अॅडव्हर्सिटी ) या जोखीमबाबीअंतर्गंत अग्रिम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विमा कंपनीकडून विलंब लावला जात आहे. परभणी जिल्ह्यातील १६ हजार ४८७ शेतकऱ्यांना मंजूर १० कोटी २ लाख रुपये एवढा अग्रिम पीकविम्याचे वाटप रखडले आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार ४८३ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १९६ कोटी ८ लाख रुपये एवढी अग्रिम पीकविमा रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. पीक विम्याची रक्कम का जमा केली जात नाही या बाबत विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही.

२०२३ च्या जुलै ऑगस्ट महिन्यात पावसाचा दीर्घ खंड पडला होता. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादकतेत सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत ५० टक्क्याहून अधिक घट अपेक्षित असल्यामुळे सोयाबीनच्या पीकविमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रिम विमा भरपाई जमा करावी, असे आदेश जिल्हाप्रशासनाने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. विमा कंपनीनीला अधिसूचनेद्वारे दिले होते.

त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर विमा कंपनीने जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलातील ४ लाख ४१ हजार ९७० सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी २०६ कोटी ११ लाख १४ हजार रुपये एवढा २५ टक्के अग्रिम विमाभरपाई मंजूर केली आहे. परंतु मागील अनेक आठवड्यापासून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम रक्कम जमा केली जात नाही.

तालुकानिहाय अग्रिम पीकविमा प्रलंबित रक्कम स्थिती (रक्कम कोटी रुपये)

तालुका प्रलंबित शेतकरी प्रलंबित रक्कम

परभणी ३०११ १.९५

जिंतूर १७९१ १.१८

सेलू ९९७ ०.५७

मानवत ७४४ ०.४१

पाथरी ८४७ ०.५५

सोनपेठ १७३५ १.५४

गंगाखेड ३४७७ १.८१

पालम २१७८ १.१५

पूर्णा १७०७ ०.८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT