Farmers Protest Delhi agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest Delhi : दिल्लीत पुन्हा शेतकरी आंदोलनाचा एल्गार, प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक

Farmers Protest : १३ फेब्रुवारीला दिल्लीत पोहोचून सरकारसमोर आपल्या मागण्या मांडणार आहेत. या आंदोलनात देशभरातून शेतकरी एकत्र येणार आहेत.

sandeep Shirguppe

India Farmers Union : देशातील अनेक शेतकरी संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. शेतकरी १३ फेब्रुवारीला दिल्लीत पोहोचून सरकारसमोर आपल्या मागण्या मांडणार आहेत. या आंदोलनात देशभरातून शेतकरी एकत्र येणार आहेत. सरकारने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याची शेतकरी संघटनांनी माहिती दिली.

लखीमपुरी खेरी घटनेला न्याय, कर्जमाफी आणि पिकांना एमएसपी हमी या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकऱ्यांच्या इतरही अनेक मागण्या आहेत ज्यासाठी ते दिल्लीत आंदोलन करणार आहेत. शेतकरी आतापासूनच या आंदोलनाची तयारी करत आहेत. या संदर्भात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नेत्यांनी अमृतसरच्या जंदियाला येथे जोरदार मोटरसायकर रॅली काढली.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रॅली काढली. कर्जमाफी, लखीमपूर खेरी न्यायसह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यानंतर आज(ता.०६) रोजी बर्नाळा येथे मेगा रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. यानंतरही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास लवकरच दिल्लीत नव्याने आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.

पंजाब-हरियाणामध्ये आंदोलने तीव्र

पंजाब आणि हरियाणा अजूनही शेतकरी आंदोलनाचा बालेकिल्ला समजला जातो. हरियाणात यंदा निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक झाला आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरीही एकत्र येत आहेत. पंजाबमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाचा दर वाढावा अशी मागणी केलीय. सरकारने त्यात वाढ केली असली तरी ते यापेक्षा जास्त मागणी करत आहेत. हरियाणामध्येही अशीच मागणी आहे ज्यासाठी शेतकरी एकत्र येत आहेत.

शेतकऱ्यांची सर्वात मोठी मागणी कर्जमाफीची आहे. सरकारने शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राला दिलेल्या कर्जाचा समावेश आहे. अशाप्रकारे दिल्ली मोर्चादरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी सर्वाधिक महत्त्वाची ठरणार आहे. दिल्ली आंदोलनात शेतकरी हा मुद्दा जोरदारपणे मांडणार आहेत.

पिकांना एमएसपी हमी देण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. सरकारने पिकांच्या किमान आधारभूत किमतीचा हमीभाव द्यावा आणि त्यासाठी संसदेत कायदा करावा, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. यामुळे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

व्यापारी त्यांच्या उत्पादनाचा आणि त्यांच्या मेहनतीचा जास्तीत जास्त फायदा घेतात, तर काही वेळा त्यांना खर्च काढणे कठीण जाते. टोमॅटो आणि कांद्याचे भाव गगनाला भिडल्याचे अनेकवेळा दिसून आले परंतु सरकारच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा दर कोसळले यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी एमएसपीच्या हमीभावाची मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT