Solar Project Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Project : सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज

Day-Time Electricity : मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अंतर्गत अकोला जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीजपुरवठा सुरू आहे.

Team Agrowon

Akola News : मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अंतर्गत अकोला जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीजपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात १२ ठिकाणी ५५ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ६३ प्रकल्पांद्वारे २०५ मेगावॉट वीज निर्माणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येत्या तिमाहीत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गतीने प्रयत्न सुरू करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले आहेत.

येथे नियोजनभवनात आयोजित मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, ‘महावितरण’चे संचालक सचिन तालेवार, सौर सल्लागार श्रीकांत जलतारे आदी या वेळी उपस्थित होते.

सध्या जिल्ह्यात १२ ठिकाणी ५५ मेगावॉट सौर प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. त्याद्वारे १९ हजार शेतकऱ्यांना दिवसा विजेचा लाभ मिळत आहे. उद्दिष्टानुसार, उर्वरित काम पूर्णत्वास जाण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा. त्यासाठी लोकसंवाद व प्रबोधन करावे.

सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय व खासगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन व सौर प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा आदी कामांना गती द्यावी, स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत या बाबत जागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रकल्पांसाठी शासकीय जागा मिळवून देण्यात अकोला जिल्हा आघाडीवर आहे. शासकीय इमारतींवरील सौर-विद्युतीकरणातही गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात ८५० इमारतींवर सोलरायझेशनसाठी प्रयत्न होत आहेत.

त्याचप्रमाणे, मॉडेल म्हणून २८ गावांना सौर-ग्राम करण्याचाही प्रयत्न आहे. सौर निर्मिती प्रकल्पांद्वारे शेतीला दिवसा वीज पुरवठ्यासाठी प्रकल्प निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगाने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT