Akola Development Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Development Fund : ‘नियोजन’च्या ३७४ कोटींच्या खर्चाला मंजुरी

Development Plan Akola : जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी २०२४–२५ या आर्थिक वर्षातील ३७४ कोटी २१ लाख रुपयांच्या खर्चास जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी २०२४–२५ या आर्थिक वर्षातील ३७४ कोटी २१ लाख रुपयांच्या खर्चास जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात ही बैठक पार पडली.

यावेळी आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, नितीन देशमुख, साजिद पठाण, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, किरण सरनाईक, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री फुंडकर म्हणाले, की जिल्ह्यातील सर्व विभागांनी निधीचा योग्य वापर करीत नियोजनबद्ध आणि काटेकोर कामकाज करावे. प्रस्ताव वेळेत सादर करून प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता प्रक्रियेत विलंब टाळावा. त्यांनी पुढे सांगितले की, आगामी वर्षासाठी ४३७ कोटी ५१ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर असून, त्यानुसार कामांच्या मान्यताही लवकर पूर्ण कराव्यात.

शेतकऱ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल

कृषी उत्पादनांचे लिकिंग, खोटे पंचनामे, व पीकविमा कंपन्यांच्या हलगर्जीपणावर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी यावेळी दिले. एचडीएफसी एर्गो पीक विमा कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, खोट्या पंचनाम्याची कागदपत्रे कृषी विभागाने पोलिसांकडे सुपूर्द करावीत.

जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले. खतांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करावे, कोचिंग क्लासेससाठी फायर ऑडिट अनिवार्य करण्याची कार्यवाही व्हावी असे सांगत त्यांनी अनुपालन विषयक विविध बाबींवर आढावा घेतला.

विभागनिहाय मंजुरी

सर्वसाधारण योजना :

२७० कोटी ७७ लाख

अनुसूचित जाती उपयोजना :

८७ कोटी ९८ लाख

आदिवासी उपयोजना :

१५ कोटी ४५ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT