Solapur DPDC : सोलापूर जिल्ह्याला २०० कोटी रुपयांचा वाढीव निधी देणार

Development Fund : राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय वार्षिक योजनांचा आढावा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ सर्वसाधारण अंतर्गत निधी वाढवून देण्यात येणार आहे.
Solapur DPDC Meeting
Solapur DPDC Fund Agrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय वार्षिक योजनांचा आढावा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ सर्वसाधारण अंतर्गत निधी वाढवून देण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यानेही अतिरिक्त २०० कोटी रुपयांची मागणी केली असून, त्यानुसार हा वाढीव निधी देण्यात येईल, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.७) दिले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री पवार बोलत होते. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार देवेंद्र कोठे, आमदार नारायण पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शीतल उगले तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, पुंडलिक गोडसे, प्रीतम कुंटला यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते.

Solapur DPDC Meeting
DPDC Funding: शेतकऱ्यांसाठी टेक्नोलॉजीची नवी संधी! ड्रोनसाठी ‘डीपीडीसी’ निधी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की निधी वाढवून देऊच, परंतु सर्व यंत्रणांनी मंजूर झालेला निधी शंभर टक्के खर्च करण्याबाबत योग्य नियोजन करावे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतील मंजूर निधी त्या अंतर्गत प्रस्तावित केलेल्या नावीन्यपूर्ण कामावरच खर्च झाला पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवून घ्यावेत. तसेच यावर्षी पासून जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी दिव्यांगासाठी ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणेच जिल्हा एकात्मिक प्रारूप आराखड्या अंतर्गत मंजूर केलेल्या २८२ कोटीच्या निधीतून उजनी धरणात प्रस्तावित असलेल्या जलपर्यटन आराखड्याची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली.

Solapur DPDC Meeting
DPDC Funds: ‘डीपीडीसी’ला निधी वाढवून दिला जाईल

पालकमंत्री गोरे यांनी सोलापूर जिल्ह्याने जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत अतिरिक्त मागणी केलेल्या २०० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी केली. तसेच सन २०२४-२५ अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला ६० टक्के निधी प्राप्त झालेला असून, उर्वरित ४० टक्के निधी लवकरात लवकर देण्याची मागणीही या वेळी त्यांनी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतील तरतूद आणि कामांची माहिती दिली.

दोन महिन्यांत ४० टक्के निधी देणार

सोलापूर जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ सर्वसाधारण अंतर्गत आतापर्यंत ६० टक्के निधी उपलब्ध करून दिलेला आहे. उर्वरित ४० टक्के निधीपैकी २० टक्के निधी याच महिन्यात तर उर्वरित २० टक्के निधी पुढील महिन्यात असे दोन महिन्यात हे पैसे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. तर उपलब्ध झालेला शंभर टक्के निधी सर्व शासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करून खर्च करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com