Akola Rain fall Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Rain fall: जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस

Maharashtra Monsoon 2025: यावर्षी जून महिन्यात पावसाने सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात हजेरी दिली आहे. या महिन्यात जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १३६.९ मिलिमीटर आहे. यंदा महिन्यात १५५.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Akola News: यावर्षी जून महिन्यात पावसाने सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात हजेरी दिली आहे. या महिन्यात जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १३६.९ मिलिमीटर आहे. यंदा महिन्यात १५५.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ११३.८ टक्के आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

अकोट तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १२४.५ मिलिमीटर आहे. या तालुक्यात यंदा जून महिन्यात १५३.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १२३.३ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १८०.८ मिलिमीटर (सरासरीच्या १४५.१ टक्के) होते. तेल्हारा तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १२० मिलिमीटर आहे.

तेल्हारा तालुक्यात यंदा जून महिन्यात १६३.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १३६.१ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३४.२ मिलिमीटर (सरासरीच्या १११.९ टक्के) होते. बाळापूर तालुक्यात सरासरी पर्जन्यमान १३०.१ मिलिमीटर व तालुक्यात यंदा जून महिन्यात १७१.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हा पाऊस सरासरीच्या १३२ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १२४.६ मिलिमीटर (सरासरीच्या ९५.८ टक्के) होते. पातूर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १५५.६ मिलिमीटर व तालुक्यात यंदा जून महिन्यात २१८.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १४०.३ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १७१.४ मिलिमीटर (सरासरीच्या ११०.२ टक्के) होते.

अकोला तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १३४ मिलिमीटर व तालुक्यात यंदा जून महिन्यात १३१.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ९८.४ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १११.९ मिलिमीटर (सरासरीच्या ८३.५ टक्के) होते. बार्शिटाकळी तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १४८.१ मिलिमीटर आहे. तालुक्यात यंदा जून महिन्यात १८०.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हा पाऊस सरासरीच्या १२२.१ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३३.६ मिलिमीटर (सरासरीच्या ९०.२ टक्के) होते. तर मूर्तिजापूर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १४५.८ मिलिमीटर असून तालुक्यात जून महिन्यात ११८.२ मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या ८१.१ टक्के आहे. जूनमध्ये शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने सार्वत्रिक पेरण्यांना वेग आला. जिल्ह्याची लागवड ६५ टक्क्यांवर पोचल्याचा अंदाज आहे.

प्रकल्पाला फायदा

काटेपूर्णा प्रकल्पाचा साठा १२ टक्क्यांवर आता २० टक्क्यांपर्यंत पोचला आहे. या प्रकल्पात सध्या २८.३६ दलघमी इतकी साठवण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या ६ टक्के पाणी साठा अधिक आहे. या प्रकल्पाची ८६.३५४ दलघमी साठवण क्षमता आहे. सातपुडा पर्वतरांगेत अद्याप जोरदार पाऊस न झाल्याने वाण प्रकल्पाचा साठा पूर्वी इतकाच कायम आहे. यात सध्या ३४.५८ टक्के म्हणजेच २९.८५ दलघमी इतका साठा आहे. जिल्हयात उर्वरित प्रकल्पात मोर्णा ४३.३१ टक्के, निर्गुणा प्रकल्प ९४.४ टक्के, उमा ४.५९ टक्के तर दगडपारवा २४.१४ टक्के भरलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT