Akola Rain News : अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाला सुरुवात

Heavy Rain : अहिल्यानगर जिल्‍ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात फारसा पाऊस नव्हता. दोन दिवसांपासून या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आता या पावसामुळे भात रोपे टाकण्याला सुरुवात होणार आहे.
Ambegaon Rain fall
Ambegaon Rain fallAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्‍ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात फारसा पाऊस नव्हता. दोन दिवसांपासून या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आता या पावसामुळे भात रोपे टाकण्याला सुरुवात होणार आहे.

गुरुवारी (ता. १९) सकाळी आठपर्यंत चोवीस तासांत रतनवाडी येथे १६९, घाटघरला १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही गुरुवारी दिवसभर पावसाच्या सरी सुरू होत्या.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीच मशागतीची कामे लवकर उरकली. अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील रतनवाडी, पांजरे, वाकी, घाटघर यासह हरिचंद्रगड पट्ट्यात पावसानंतर भात रोपे टाकली जातात. या भागात अवकाळी झालेला काहीसा पाऊस सोडता अजूनही फारसा पाऊस नव्हता.

Ambegaon Rain fall
Baramati Rain Damage: अतिवृष्टीमुळे बारामती उपविभागात १४ कोटींचे पीक नुकसान

दोन दिवसांपासून मुंबई, कोकणात पाऊस सुरू झाल्याने अकोल्याच्या पश्चिम भागातील रतनवाडी, पांजरे, वाकी, घाटघर यासह हरिचंद्रगड, कळसुबाई शिखर परिसरातही चागंल्या पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरू होणार आहे. याशिवाय डोंगरपट्ट्यातील अन्य धरणे भरण्याला मदत होणार आहे.

पावसाला सुरुवात झाल्याने मशागतीसह रोपे टाकण्यासाठी शेत रापण्याच्या कामाची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा पावसाला लवकर सुरुवात झाल्याने तसेच भंडारदरा धरणात सध्या २९.३० टक्के, निळवंड्यात ३१.५५ टक्के, मुळात ३५.९६ टक्के पाणी साठा आहे.

Ambegaon Rain fall
Pune Heavy Rain: आंबेगावमध्ये सर्वाधिक १९४ मिमी पाऊस

मुळा धरणही हरिचंद्रगड परिसरातील पावसावर अवलंबून असते. यंदा पाऊस लवकर सुरू झाला असल्याने भंडारदरा धरण लवकर भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, अहिल्यानगर, राहाता, राहुरी, कोपरगाव, जामखेड, शेवगाव, कर्जत भागातही दोन दिवसांपासून पावसाच्या सरी पडत आहेत. गुरुवारी दिवसभर अधूनमधून सरी सुरू होत्या.

चोवीस तासांत झालेला पाऊस (मिलिमीटर)

घाटघर ः १५७, रतनवाडी ः १६९, पांजरे ः १२५, भंडारदरा ः १२७, निळवंडे ः १०४, कोतुळ ः ६५, अकोले ः ३७, साकीरवाडी ः ६६, राजुर ः ५६, शेंडी ः ५६, ब्राह्मणवाडा ः ५२, वाकी ः ५६, घारगाव ः ३०, धांदरफळ ः ३७

अकोले तालुक्यात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण यंदा लवकर भरण्याची आशा आहे. मे महिन्यात झालेल्या पावसाने यंदा आतापर्यंत राज्यात ३३ टक्के पाणीसाठा झाला आहे. काही भागातील लहान धरणे भरली आहेत. अनेक भागांत यंदा पावसाची स्थिती चांगली राहील असे दिसतेय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने यंदा पावसाबाबतची स्थित लाभदायक आहे.
- हरिचंद्र चकोर, जलसिंचन तज्ज्ञ, संगमनेर, जि. अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com