Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Monsoon Rain : अकोला जिल्ह्याला पुन्हा पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

Crop Damage : जोरदार वादळासह झालेल्या पावसाने या भागात केळी, पपईच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यात पूर्वमोसमी पावसाने सोमवारी (ता. १३) पहाटेच जोरदार तडाखा दिला. जोरदार वादळासह झालेल्या पावसाने या भागात केळी, पपईच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. तीन दिवसांच्या अंतरात दुसऱ्यांदा हे मोठे संकट शेतकऱ्यांवर ओढवले.

हवामान खात्याने जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला असून सोमवारी (ता. १३) सूर्योदयाच्यावेळीच तेल्हारा तालुक्यात चितलवाडी, गोरव्हा. खंडाळा, आदी गाव शिवारात हे वादळ घोंगावले. या भागात तिनशे एकरापेक्षा अधिक लागवड असून यापैकी बहुतांश केळी पिकाचे नुकसान झाले.

पपईच्या फळांवर गारीचा मार बसल्याने नुकसान झाले. केळी, पपईची झाडे तुटून पडली. गारपिटीमुळे टरबुजाच्या फळांना तडाखे बसले. चितलवाडी येथील ज्ञानेश्वर इंगळे, हृषिकेश इंगळे, अनंता भिकाजी इंगळे, उद्धव इंगळे, सारंगधर पाथ्रीकर, राजू पाथ्रीकर, उत्तम देवळे, अंकुश शिंगणे, सुमित इंगळे यांच्यासह इतरांचे मोठे नुकसान झाले. शासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

संत्र्याचा ताण तुटला

मे महिना हा संत्रा बागांना या काळात शेतकरी बागांना ताणावर सोडतात. संत्रा झाडांना पाण्याचा ताण योग्य बसला तरच बाग फुटते. बहार धरतो.

हा ताण किमान महिनाभर तरी असावा लागतो. मधातच ताण सुटला तर झाडांवर नवीन पालवी फुटते. यामुळे आता झाडांवर फुलोर, बहार येण्याची शक्यता मावळली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT