Baramati News: कंत्राटदार राजकारणातून पदाधिकारी होत असल्याने जनतेमध्ये चीड निर्माण होते, अर्थातच पक्ष प्रमुख म्हणून आम्ही जनतेच्या त्या प्रचंड रोषाचे धनी होतो. याशिवाय अधिकाऱ्यांनाही सरकारी कामे दर्जेदार करण्यास अडथळा निर्माण होतो. हा दुहेरी तोटा आता मला सहन होत नाही.
मी आठ वेळा आमदार झालो, यापुढे मी कसाही आमदार म्हणून सभागृहात जाईल, परंतु कंत्राटदार लोकांना राजकारणाचे दरवाजे बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली.
शिरष्णे (ता. बारामती) येथील शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. शिरष्णे येथे श्री स्वामी समर्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने नव्याने दूध बल्क कूलरची उभारणी केली आहे. त्या कामी संस्थेचे प्रमुख संतोष जाधव यांनी पुढाकार घेतला होता. या कूलरच्या उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले.
बारामतीसह राज्यात कंत्राटदार राजकारणातून पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असतात. ही संख्या मोठी होत चालली आहे. अर्थात हे लोकांना आवडत नसल्याचे लोकसभा आणि विधासभा निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘ज्यांना राजकारण अथवा कार्यकर्ता व्हायचे आहे, त्यांनी कंत्राटदार क्षेत्रात यायचे नाही.
तसे झाल्यास नवीन आणि गावपळीवर चांगले पक्षाचे काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळेल. परिणामी अधिकाऱ्यांनाही दर्जेदार काम करणे सोईचे होईल. जनतेतही राष्ट्रवादीची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. बूथ कमिटीत चांगले काम केलेल्या सदस्यांच्या मतांचा अधिकाधिक विकास प्रक्रियेत विचार केला जाईल.’’
अवैद्य धंदे बंद न झाल्यास माझ्याशी गाठ
अजित पवार म्हणाले, ‘‘बारामतीत कोयता गॅंग पुन्हा डोके वर काढायला लागली आहे. नुकतेच पणदरे येथे अल्पवयीन मुलांना गंभीर गुन्हा केला. याशिवाय अवैद्य धंद्यांमुळे बारामतीत गावकऱ्यांना त्रास होतो. यापुढे ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हे प्रकार पूर्णतः बंद होणार नाहीत,
त्या संबंधित पोलिस निरीक्षकाची (पीआय) माझ्याशी गाठ आहे. पोलिसांना निवास, वाहने, प्रशस्त कार्यालये शासनस्तरावर दिली आहेत, असे असताना संबंधित अधिकारी मिरविण्यापुरते काम करताना आढळून आले आहेत. त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करावी.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.