Jalgaon News: खानदेशात दर्जेदार केळीची आवक वाढत आहे. परंतु दरात मोठी वाढ सध्या दिसत नाही. खानदेशातून देशांतर्गत बाजारात केळीची पाठवणूक सुरू आहे. रमजानचे पर्व सुरू आहे. या काळात केळी दरात मोठी सुधारणा होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशेवर युद्ध स्थितीमुळे पाणी फिरले आहे..केळीची आवक या रमजान सणानिमित्त बऱ्यापैकी वाढली आहे. थंडीची बाधा न झालेल्या (नॉन चिलिंग केळीस प्रति क्विंटल १६०० रुपये दर आहे. किमान दर १००० ते रुपये प्रति क्विंटल असे आहेत. पंजाब, दिल्ली येथे पाठवणुकीच्या केळीचे दर १३०० ते १४५० रुपये प्रति क्विंटल, असे आहेत. तर काश्मिरात पाठवणुकीच्या केळीला प्रति क्विंटल १६०० रुपये सर्वाधिक दर आहेत..Banana Farming: सेंद्रिय देशी केळी बागेला शास्त्रज्ञांची भेट.केळीची आवक जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागात बऱ्यापैकी सुरू झाली आहे. सध्या प्रतिदिन १७५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. ही आवक पुढे वाढणार असून, दर्जेदार केळी काढणीसाठी उपलब्ध होईल..Banana Farming: केळी घडांचा दर्जा राखण्यावर भर.मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही सध्या प्रति दिन ६० ते ७० ट्रक केळीची आवक होत आहे. तेथेही कमाल दर १६०० रुपये प्रति क्विंटल, असे आहेत. जळगाव, जामनेर या भागांत केळीची आवक कमी झाली आहे. कारण या भागात मृग बहरातील केळीची लागवड कमी असते. सर्वाधिक आवक रावेर तालुक्यात होत आहे..या भागात पिलबाग केळीसह मृग बहर केळीत काढणी सुरू झाली आहे. जशी उष्णता वाढेल, तशी आवकही वाढणार आहे. दरात पडझड झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. केळी दर मागील महिन्यात २४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. पण दरात मागील ११ ते १२ दिवसांत मोठी घसरण झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.