Mahayuti Sarkar Formation Formula Agrowon
ॲग्रो विशेष

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Ajit Pawar : राज्यात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले असून आता मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा केली जात आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात महायुती सरकार येणार हे निश्चित झाले असून आता कोणाला मंत्रिपदाची लॉट्री लागणार याबाबती चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महायुतीच्या मंत्रिमंडळ्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली आहे.

महायुतीतील बलाबल

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले असून भाजपचे १३२ आमदार निवडणून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ५२ आमदार असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडणून आले आहेत. त्यामुळे आता कोणाला किती मंत्रिपदे मिळणार यावर खलबतं होताना दिसत आहेत.

मंत्रिपदाचा फार्म्युला

सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भाजपच्या वाट्याला २२ - २३ मंत्रिपदे येण्याची शक्यता असून शिंदेसेनेच्या वाट्याला १०-१२ मंत्रिपदे येऊ शकतात. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसला ८-१० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री?

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावर महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून चर्चा करणार असून मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? शपथविधी कधी होणार? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद दिली जाणार यावर बैठका होत आहेत. महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी (ता.२५) किंवा मंगळवारी (ता.२६) होण्याची शक्यता असून मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील असेही बोलले जात आहे.

अजित पवारांची गटनेतेपदी निवड

विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलेला आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाला देखील चांगले यश मिळाले आहे. अजित पवार गटाच्या उमेदवारांचा ५३ जागांपैकी ४१ जागांवर विजय झाला आहे. आता अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीत अजित पवार यांनी पुतण्या युगेंद्र पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

राज्यात त्रिमूर्ती सरकार : केसरकर

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी, राज्यात त्रिमूर्ती सरकार आले आहे. मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेतील. हा विजय तिन्ही नेत्यांनी केलेल्या कामाचा असल्याचे केसरकर म्हणाले. राज्यात यंदाची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. राज्यातील जनतेनं प्रचंड प्रतिसाद दिला.

आमच्या महायुतीच्या २८८ पैकी २३० जागा निवडणून आल्या. आमचे ५२ आमदार विजयी झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना कोणाची आहे याचा निकालच जनतेने दिल्याचेही केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच महायुतीच्या यशामागे राहुल गांधी यांचे देखील मोठे योगदान असल्याचा टोला केसरकर यांनी लगावला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT