Manikrao Kokate Controversy Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यावर सोमवारी निर्णय घेऊ; अजित पवार

Ajit Pawar: कृषिमंत्र्यांचा सभागृहात रमी खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल प्रकरणावर आणि राजिनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (ता.२४) प्रतिक्रिया आली आहे.

Sainath Jadhav

Pune News: कृषिमंत्र्यांचा सभागृहात रमी खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल प्रकरणावर आणि राजिनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (ता.२४) प्रतिक्रिया आली आहे. ही घटना सभागृहात घडली असून, याची चौकशी करण्यासाठी विधानपरिषद सभापतींनी समिती नेमल्याची माहिती आहे.

मी आणि मुख्यमंत्र्यानी वेळोवेळी नेत्यांना सावधगिरी बाळगून बोलण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणावर आता कृषिमंत्र्यांशी सोमवारी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीही कृषिमंत्र्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेतले होते. विरोधकांनी याप्रकरणी कृषिमंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पत्रकारांशी बोलताना आज (ता.२४) अजित पवार म्हणाले, "मला मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना विधान परिषदेच्या सभागृहात घडली आहे.

सर्वांना माहित आहे की, विधीमंडळाचा परिसर हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अखत्यारीत येतो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली आहे, अशी माझी माहिती आहे." कृषिमंत्री मला अजून समक्ष भेटलेले नाहीत.

मी मुंबईत नव्हतो, त्यामुळे त्यांच्याशी भेट झाली नाही. कृषिमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे. पण माझ्याशी या विषयावर त्यांचे कोणतेही बोलणे झालेले नाही. मी त्यांना सोमवारी भेटणार आहे आणि त्यांच्याशी या प्रकरणावर सविस्तर चर्चा करणार आहे."

ते पुढे म्हणाले, "महायुतीच्या सर्व नेत्यांवर या राज्याची मोठी जबाबदारी आहे. सर्वांनीच जबाबदारीने वागले पाहिजे, बोलले पाहिजे आणि योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत. याबाबत आम्ही सर्वांना सूचना दिल्या आहेत. यापूर्वीही कृषिमंत्र्यांकडून अशी चूक एकदा घडली होती. तेव्हाही मी त्यांना असा प्रकार पुन्हा घडू नये, अशी सूचना केली होती.

दुसऱ्यांदा असा प्रकार घडला तेव्हाही मी त्यांना सांगितले होते की, ‘इजा झालंय, बिजा झालंय, तिजा होऊ देऊ नका.’ आता कृषिमंत्री म्हणत आहेत की, त्यांनी ती गोष्ट केलीच नाही. चौकशीत जे स्पष्ट होईल, ते पुढे येईलच. पण आता मी सोमवार त्यांच्याशी समोरासमोर बोलणार आहे आणि त्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल."

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Electric Agricultural Tractors: 'इलेक्ट्रिक ट्रॅक्टर'च्या बदललेल्या नियमांचा शेतकऱ्यांना फायदा काय?

Silkworm Winter Care: चांगल्या उत्पादनासाठी रेशीम किड्यांची थंडीत काळजी आवश्यक

Rural Health Camp: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आरोग्य शिबिर

Livestock Exhibition: वावी येथे प्रथमच पशू प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन

Rabi Crop Insurance: सव्वा लाख शेतकऱ्यांनी भरला रब्बीचा पीकविमा

SCROLL FOR NEXT