Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : गायीच्या दुधाला ३५ रूपये दर द्या अन्यथा, किसान सभेचा दुग्ध मंत्र्यांना इशारा

Cow Milk Price : दुधाचे दर पडू नये म्हणून राज्याचे दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक समिती गठीत केली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Cow Milk Rate : मागच्या काही दिवसांपासून राज्यात दुधाच्या दरावरून संघर्ष सुरु आहे. राज्य सरकारने ३४ रुपये प्रमाणे गायीच्या दुधाचा दर ठरवून दिला आहे परंतु राज्यातील सगळ्याच दूध संस्थांकडून या नियमाला धाब्यावर ठेवत ठरवून दिलेल्या गायीच्या दुधाच्या दर देत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान यावरून किसान सभेने इशारा दिला आहे.

यावर किसान सभेचे अजित नवले म्हणाले की, राज्यातील दूध उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत. गायीच्या दुधाच्या दरात अचानक मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर ३५ रुपयांचा दर मिळत होता.

मात्र, सध्या दुधाला प्रति लिटरसाठी २७ रुपयांचा दर मिळत आहे. याच मुद्यावरुन किसान सभा आक्रमक झाली आहे. गायीच्या दुधास प्रतिलिटर ३५ रुपयांचा दर द्यावा अशी मागणी किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केली आहे.

दुधाचे दर पडू नये म्हणून राज्याचे दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये खासगी आणि सरकारी दूध संघाच्या संचालक प्रतिनिधींचा समावेश केला होता. मात्र, सध्या दुधाला कमी दर मिळत असताना समिती असेल मंत्री असतील काहीच भूमिका घेत नसल्याचे मत किसान सभेचे नेते अजित नवलेंनी व्यक्त केली.

दुधाला किमान ३५ रुपयांचा दर मिळावा. सरकारनं याकडे लक्ष घालावे असे अजित नवले म्हणाले. जर दुधाला ३५ रुपयांचा दर मिळाला नाही तर मंत्र्यांच्या दारात दूध ओतण्याचे काम आम्ही करु असा इशारा नवलेंनी दिला. दूध दराच्या मुद्द्यावरुन अजित नवलेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय या राज्यात काहीच होणार नाही का? असा सवाल अजित नवलेंनी केली आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचीही लूट सुरु आहे. हे दोत असताना गतिमान सरकार झोपले का? असा टोला नवेलेंनी लागावला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT