Cow Milk Rate Gokul : 'गोकुळमधील शिवसेना संचालकांना शेतकऱ्यांपेक्षा मलई महत्त्वाची', शिवसेना ठाकरे गटाचा आरोप

Gokul Milk : 'गोकुळ'मधील शिवसेनेचे तीन संचालक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नसून ते मलई खाण्यासाठीच आहेत का, असा सवाल करण्यात आला.
Cow Milk Rate Gokul
Cow Milk Rate Gokulagrowon
Published on
Updated on

Shivsena Gokul Milk : गोकुळने कपात केलेला गाय दूध दराविरोधात मागच्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान काल शिवसेना ठाकरे गटाकडूनही आंदोलन करण्यात आले. यावेळी गोकुळ संचालकांनी दहा दिवसांत आपला निर्णय बदलला नाही, तर परजिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणारे दुधाचे टँकर अडवले जातील, असा इशारा शिवसेनेच्या वतीने (उध्दव ठाकरे गट) आज देण्यात आला.

'गोकुळ'मधील शिवसेनेचे तीन संचालक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नसून ते मलई खाण्यासाठीच आहेत का, असा सवाल करत 'गोकुळ'मधील विरोधी संचालकही मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका करण्यात आली. यावेळी शासनाच्या किमान आधारभूत किमतीच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने 'गोकुळ'च्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे व इतर संचालकांमध्ये झालेल्या चर्चेवेळी दर वाढवून देण्याबाबत तोडगा निघाला नाही. यातच अध्यक्ष डोंगळे यांनी शिवसेनेचे तीन संचालक आहेत. त्यांना दूध दरवाढीची वस्तुस्थिती विचारली असती तर त्यांनी याबदल कारण सांगितले असते.

मात्र, तसे न करता त्यांनी आंदोलन केले, असे मत डोंगळे यांनी व्यक्त केले. हाच धागा पकडत आंदोलकांनी 'गोकुळ'मध्ये असलेल्या शिवसेनेच्या तीन संचालकांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम राहिले पाहिजे. मात्र, या संचालकांना शेतकऱ्यांपेक्षा मलई महत्त्वाची वाटत असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि रविकिरण इंगवले यांनी केले.

Cow Milk Rate Gokul
Gokul Milk Kolhapur : तुकाराम मुंढेच्या आदेशाचा 'गोकुळ'ला तगडा झटका, १ हजार दूध संस्थांवर कारवाई होणार

'गायीच्या दूधदरात प्रतिलिटर रुपये ४ कपात करून शेतकऱ्यांचा तोटा केला आहे. कर्जबाजारी तरुणांनी आत्महत्या कराव्यात का? तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक तरुण रस्त्यावर येणार आहेत. एकीकडे वासाचे दूध परत देणार म्हणून निवडणूक लढवली. आता वासाचे दूध परतही दिले जात नाही आणि दरही जास्त दिला जात नाही. ही पिळवणूक थांबली पाहिजे असे संजय पवार म्हणाले.

याचबरोबर 'जिल्ह्यात शेतीसह दुग्ध व्यवसाय मुख्य व्यवसाय झाला आहे. एकीकडे दुधाच्या दराची कपात केली जात आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे दरही चढेच ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी बाजूने अडचणीत आणण्याचे काम केले जात असल्याचे विजय देवणे म्हणाले.

अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, राज्यात आणि देशात दुधाचे उत्पादन वाढले आहे. यापूर्वी दूध विक्रीला चांगला दर होता. त्यावेळी उत्पादकांनाही चांगला दर दिला आहे." यावेळी संचालक विश्वास पाटील, सुजित मिणचेकर, बाळासाहेब खाडे, अमरिष घाटगे, एस. आर. पाटील, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, मंजित माने, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com