PM Janman Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Tribals Home Scheme : खेडमध्ये आदिवासींना ३५३ घरे देण्याचे उद्दिष्ट

PM Janman Yojana : ‘‘शासनामार्फत खेड तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबांसाठी पंतप्रधान जनमन घरकुल योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Rajgurunagar News : ‘‘शासनामार्फत खेड तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबांसाठी पंतप्रधान जनमन घरकुल योजना राबविण्यात येत आहे. खेड तालुक्याला ३५३ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शासनपातळीवर जागा उपलब्ध होताच घरकुलांचा निधी देण्यात येईल,’’ अशी माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली.

केंद्र सरकारने कातकरी समाजासाठी पीएम जनमन कार्यक्रम सुरू केला आहे. खेड तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबांची संख्या जास्त आहे. वर्षानुवर्षे ही कुटुंबे झोपडीत राहत होती. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नव्हता. शिवाय, त्यांना जातीचे दाखले मिळत नसल्याने त्यांच्या मुलांच्या माध्यमिक व उच्च शिक्षणाला खीळ बसला आहे.

जागेअभावी योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यास खेड पंचायत समितीला अडचण येत आहे. मात्र सरकारने यावर पर्याय म्हणून ज्या कुटुंबाला घरकुलासाठी जागा नाही, त्यांना ती देण्यासाठी जागेचे पैसे शासन देणार आहे. यासाठी शासन आणि ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काही गावांचे सर्वेक्षण केले गेले आहे. जागा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ओबीसी आणि एनटी प्रवर्गातील कुटुंबांना घरकुल मिळेल. त्याबाबत लाभार्थींची नवीन यादी तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती विस्तार अधिकारी अनिता ससाणे यांनी दिली.

घरांसाठी मिळणारी रक्कम...

- घरकुल बांधण्यासाठी २ लाख रुपये मिळणार

- जागा घेण्यासाठी १ लाखाची तरतूद

- घर बांधताना ९० दिवसांसाठी २९५ रुपये प्रतिदिन मजुरी

- शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये मिळणार

ज्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, त्यांना जागा देण्यासाठी संबंधित गावांमध्ये बैठक घेतली आहे. डेहणे, वाघू गावातील प्रश्‍न सुटला आहे. शिरगाव आणि इतर काही गावात आमचे प्रयत्न सुरू आहेत.
विशाल शिंदे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, खेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wedding Expenses : अतिवृष्टीबाधित कुटुंबातील लग्नाचा खर्च शिवसेना करणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

Fruit Processing: विना कर्ज, प्रशिक्षण, कौशल्यातून मोठा केलेला प्रक्रिया उद्योग

Local Body Elections: बारा नोव्हेंबरला मतदार यादी होणार जाहीर

Sugarcane Rate Protest: कोल्हापूर जिल्ह्यात कारखाना समर्थक- ऊस आंदोलकांमध्ये संघर्ष

Flower Farming: फुलशेतीतील मूल्यवर्धनातून कुटुंबाला आर्थिक सक्षमता

SCROLL FOR NEXT