Solapur News : ग्रामीण भागातील १३८ भूमिहीन बेघर लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जिल्हा परिषदेमार्फत गावठाण जागेतील प्रत्येकी ५०० चौ.फु. जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
तालुका व गावनिहाय लाभार्थी संख्या पुढील प्रमाणे माढा तालुक्यातील घोटी- १५, जामगाव ०२ रोपळे खुर्द. १. मानेगाव- १, सोनंद. ६, खैराव ११, निमगाव टें- ४, उपळाई खु. ९, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी २, सिंदखेड- १, मंगळवेढा तालुक्यातील ढवळस ०२, तळसंगी- १६, लवंगी. ४, डोणज ४, नंदूर. ९, मोहोळ तालुक्यातील आष्टी- २२, सांगोला तालुक्यातील सोनंद- २७, माळशिरस तालुक्यातील निमगाव ९ असे एकूण १३८ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी ५०० चौ.फु. जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसा आदेश संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आलेला आहे.
केंद्र व राज्य शासनाने सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इत्यादी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील घरकुले बांधण्यासाठी प्रत्येकी रुपये १.२० लक्ष अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
तथापि, या योजनेतील घरकुलास पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलांचा लाभ मिळणे पासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन मनिषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी मोहीम स्वरूपात भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्धता करणे अभियान राबवून माहे ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात २१२९ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकारणार
अद्यापही पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या २०९० लाभार्थी जागेअभावी वंचित असल्याचे व त्यांनाही नजीकच्या कालावधीत जागा उपलब्ध करून देवून गरीब लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याकामी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी हे अविरत काम करत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.