AI Technology In Farming agrowon
ॲग्रो विशेष

AI Technology In Farming : आता शेतीत एआय तंत्रज्ञान उसाचा उत्पादनाबरोबर साखर उताऱ्यातही वाढ करणे शक्य

Sugarcane Production : ऊस उत्पादकतावाढीचे मोठे आव्हान महाराष्ट्रातील शेतकरी आणि साखर कारखान्यांपुढे उभे आहे.

sandeep Shirguppe

Sugar Production : ऊस उत्पादकतावाढीचे मोठे आव्हान महाराष्ट्रातील शेतकरी आणि साखर कारखान्यांपुढे उभे आहे. बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने जागतिक संस्थांच्या सहयोगाने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञानामुळे केवळ उत्पादकताच नव्हे, तर साखर उताऱ्यातही लक्षणीय वाढ करणे शक्य होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांबरोबरच कारखानदारांचाही फायदा होणार आहे.

या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक क्षेत्राची पाहणी करण्यासाठी तसेच प्रकल्पाची माहिती देण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या ऊस विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येत आहे. राज्यात सरासरी एकरी ऊस उत्पादकता केवळ ३६.६ टन, तर खोडवा उसाची उत्पादकता २७.२१ टन आहे. त्यामुळे ऊस शेती परवडणारी राहिलेली नाही.

या समस्येवर मात करण्यासाठी बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट, ऑक्स्फर्ड विद्यापीठ व अॅग्री पायलट एआय या जागतिक संस्थांच्या सहयोगाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञान विकसित केले आहे.

उत्पादकता वाढ, उत्पादन खर्चात बचत व साखर उत्ताऱ्यात वाढ करणे त्यामुळे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी केलेले प्रक्षेत्र संस्थेच्या शिवारात संबंधितांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात ऊस उत्पादनवाढीचे प्रात्यक्षिक निवडक ५०० शेतकऱ्यांच्या शेतावर येत्या आडसाली हंगामात घेतले जाणार आहे. त्यासाठी शेतकरी निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे ट्रस्टने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.

साखर कारखान्यांच्या ऊस विकास विभागांसाठीही हे तंत्रज्ञान खुले केले जाणार आहे. त्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस प्रक्षेत्राची शिवारफेरी, चर्चा आणि तज्ज्ञांकडून शंकानिरसन सत्र असा एक दिवसाचा निःशुल्क उपक्रम बारामतीत राबविला जाणार आहे.

इच्छुक कारखान्यांच्या ऊस विकास विभागांनी ३० मार्चपर्यंत आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. नोंदणी करणाऱ्यांनाच या उपक्रमात सहभागी होता येईल. नोंदणीसाठी संपर्क - ९३०९२४५६४६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT